Home महाराष्ट्र कारखाने बंद, कुंटणखाने चालू !

कारखाने बंद, कुंटणखाने चालू !

170

फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांचे मिशन आहे, कारखाने बंद आणि कुंटणखाने चालू. एक जिवंत पुरावा देतो. जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांचे उपोषण चालू आहे. तेथे फडणवीस, महाजन, गुलाबराव असा कोणताही मंत्री गेला नाही. पण जळगाव जिल्ह्यातील हॉटेल चे उद्घाटन करण्यासाठी मात्र महाजन गेले.

    दुसरा जिवंत पुरावा म्हणजे अमळनेर तालुक्यातील सात्री गावाचे पुनर्वसन आमदार अनिल पाटील यांनी पत्र देऊन अडवले आहे. गिरीश महाजन यांनी पत्र देऊन खोळंबा घातला आहे. यासाठी धरणग्रस्त लोकांनी उपोषण केले. त्याच दिवशी फडणवीस जळगावला आले होते. तरीही फडणवीस यांनी दखल घेतली नाही. कारण फडणवीस यांना कोणतेही विधायक काम करायचे नाही.

    पुनर्वसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमला आहे. तरीही पुनर्वसन का करीत नाहीत? याचे फडणवीस यांना काहीच सोयरसुतक नाही. चिंता नाही. महाजन यांना प्रश्न केला नाही कि, हे पुनर्वसन का केले नाही?कारण फडणवीस यांचा उद्देश आहे, कोणतेही विधायक काम करायचे नाही. सत्यानाश मात्र नेटाने करायचा आहे.

      गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये कुंभमेळा साठी मुद्दाम पाठवले आहे. दुष्ट हेतू आहे.परिणाम भयंकर होणारच. नाशिक सोबत महाराष्ट्र बदनाम होणारच.हेच तर फडणवीस यांचे ध्येय आहे. महाराष्ट्र राज्याचा सत्यानाश केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही. अशी भिष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली असावी.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. संघ म्हणजे हिंदू धर्म रक्षक. असे ते म्हणतात. पण प्रत्यक्षात हिंदू धर्म नाशक दिसतात. गिरीश महाजन यांची जाणिवपूर्वक नाशिक कुंभमेळा साठी नियुक्ती करणे,हाच जिवंत पुरावा आहे.जेथे रामाच्या वास्तव्याने पवित्र भुमि आहे ती बाटवायची आहे,नाशवायची आहे.क्रेडीट गोज टू फडणवीस.

    एकनाथ खडसे यांनी लैंगिक कृत्यांची सीडी प्रकरण विधानपरिषदेत मांडले.तर त्यांच्या जावईला दारू,ड्रग मधे अडकवले.म्हणजे बोलणाऱ्याची नरडी दाबणे.लैंगिक चाळ्यांची सीडी बनवून पैसा उकळणारा प्रफुल्ल लोढा हा एकमेव जिवंत पुरावा.त्याला सुद्धा पोस्को लावून जेलमध्ये टाकले.हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.जसा हर्षद मेहता,अब्दुल करीम तेलगी यांचा केला.लोढा जेलमध्ये मारला जाणार.पण याच लोढाने सहा सीडी बनवून रेफरी एपस्टीन सारखेच अनेक ठिकाणी लपवलेल्या आहेत.ती सीडी खडसे यांनी पाहिली आहे.अनेकांनी ट्रेलर पाहिले आहेत.खडसेंना सीडी पाहिजे ते शत्रूला एक्स्पोझ करण्यासाठी. लोढाला सीडी पाहिजे शंभर कोटी साठी 

      खरातचा कुंटणखाना फडणवीस यांना आधीच माहीत होता.त्यांनी सरकारी तिजोरीतून मदत केली होती.मंत्र्यांनी सुद्धा सरकारी तिजोरीवर डल्ला मारूनच कुंटणखान्यात पैसा उधळला आहे.हेतु हाच.कुंटणखाना चालला पाहिजे.

       खरात प्रकरण म्हणजे तर हायप्रोफाइल कुंटणखाना होता.तो सुद्धा सरकार ने प्रायोजित केलेला.तेथे गेलेला कोणताही नेता प्रामाणिक नाही.तेथे गेलेली कोणतीही महिला समस्याग्रस्त नाही.      

         समाजाची,धर्माची,राजकारणाची नैतिक चौकट फडणवीस यांनी मोडीत काढलेली आहे.याची इतिहासात नोंद होईलच.”फडणवीस यांच्या काळात कारखाने बंद आणि कुंटणखाने चालू,असा सरकारी उपक्रम होता.”

    जळगाव शहरातील एमआयडीसी मधील कारखाने बंद पडत आहेत.तेथे फाईव्ह स्टार हॉटेल सुरू करीत आहेत. मंत्रीगण उद्घाटन करीत आहेत.उद्देश काय? कारखाने बंद आणि कुंटणखाने चालू!

✒️शिवराम पाटील(मो:-९२७०९६३१२२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here