Home महाराष्ट्र पत्रकार अमीत देशमुख यांचे विरुद्ध उमरखेड ठाणेदार यांनी आकसापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे...

पत्रकार अमीत देशमुख यांचे विरुद्ध उमरखेड ठाणेदार यांनी आकसापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले मागे देऊन अन्याय दूर करावा – उमरखेड प्रेस क्लब 

113

✒️कुणाल श्रवले(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-7066760558

उमरखेड(दि.2एप्रिल):-तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे बंद करावे! यासाठी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून पत्रकार अमीत वसंतराव देशमुख यांचे विरुद्ध उमरखेड ठाणेदार यांनी आकसापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले मागे घेण्याबाबत व झालेला अन्याय दूर करावा. असा आशयाचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.

सविस्तर वृत्त से की, दि. 12/03/2026 रोजी धाडस 007 या युट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांना पत्रकार या नात्याने एका तक्रार कर्त्याने त्यांच्या मोबाईलवर फोन करून रात्री 9 ते 9:30 वाजताचे दरम्यान उमरखेड पोलीस स्टेशनला बोलावल्यामुळे अमित पोलीस स्टेशनला गेला. तेव्हा तेथे घटना कोणत्या प्रकारची आहे अशी पत्रकार या नात्याने विचारपूस करीत असतांना याच अमितने दि. 10/03/2026 रोजी यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक हे उमरखेड पोलीस स्टेशनला आलेले असतांना ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या समक्ष तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशन समर्थन लाभलेले अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक इत्यादी अवैध धंदे बंद करावे. अशी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे अमित देशमुख यांनी केली व यापूर्वीही वारंवार आपल्या धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून उमरखेड पोलीसांच्या आशिर्वादाने चालत असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध समाजमाध्यमातून बातम्या प्रसारित करीत होता.

याचा राग मनात धरून असलेल्या ठाणेदारांनी बनाव करून अमित देशमुख यांचे विरुद्ध शासकिय कामात अडथळा, जातिय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाचे आरोप करून भारतिय न्याय संहितेच्या कलमांनुसार अमित देशमुख घरी गेल्यानंतर मध्यरात्री उशिरा गुन्हे दाखल केले असल्याची खात्रीशीर माहिती असून एमपीएससी स्पर्धा परिक्षेच्या तयारीत असलेल्या व अन्यायाविरुद्ध तसेच समाजातील अनिष्ठ रुढी, कुप्रथा, अवैध धंद्यांविरोधात समाज हिताच्या भावनेने पुत्रकारीता करणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवकावर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार का केली ? याचा राग मनाशी बाळगून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक जीवन उध्वस्त करण्यासाठी त्याचेवर हा अन्याय केला जो पत्रकार अवैध धंद्यां विरुद्ध लिखाण करेल अथवा समाज माध्यमाद्वारे बातम्या प्रसारित करेल त्याचा डूख बाळगून यापुढे पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ठाणेदार शंकर पांचाळ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे तत्काळ स्थानांतरण करावे, सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून अमित देशमुख यांच्यावर झालेले गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली आहे.

यावेळी उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघ संघटनेचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यश गजानन वानखेडे, सचिव सिध्दार्थ दिवेकर, प्रसिद्धी प्रमुख बबलू भालेराव कुणाल श्रवले, अशोक धुळे,सल्लागार प्रसेनजीत दिवेकर, कैलास कदम तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना, संदीप विणकरे, मारोती कोल्हे, बळीराम दिवेकर इत्यादी अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here