


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.1एप्रिल):-पत्रकार संघाच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड (दि.२९ मार्च रविवार) रोजी जाहीर करण्यात आली.मावळते अध्यक्ष प्रमोद साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये नवीन वर्षाच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.शहरातील पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीस सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी पत्रकार अजित गणाचार्य,सचिवपदी पत्रकार प्रा.डॉ.अंकुश वाघमारे यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्याध्यक्षपदी संपादक राहुल डोंगरे,उपाध्यक्षपदी पत्रकार आनंद शिंदे,शहराध्यक्षपदी पत्रकार उत्तम आवके,सहसचिवपदी पत्रकार सुनील कोणार्डे यांची निवड करण्यात आली.या बैठकीस पत्रकार बाळासाहेब राखे,प्राचार्य गोविंद चोरघडे,विनायक भोसले, लक्ष्मण वानखेडे,पिराजी कांबळे, अरुण मुंडे,रामकृष्ण बचाटे,सुहास पाठक,वैभव भोसले आदी पत्रकार उपस्थित होते.















