


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.1एप्रिल):-नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेद्वारा आरोग्य विभागात आशावर्कर म्हणून काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी येथील सौ. पार्वती दिनकर उसेंडी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सेवाव्रती पुरस्कार सौ. माधुरी प्रमोद साळवे संचालिका साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लाहेरी सारख्या दुर्गम भागात पावसाळ्यामध्ये मलेरियाचे थैमान असते.
अशावेळी त्या रुग्णांच्या रक्त तपासण्या करणे तसेच त्यांना आवश्यक औषधोपचार करणे तसेच गरोदर माता यांची विशेष काळजी घेणे ह्या त्यांच्या कार्याची दखल घेत नुकताच फेब्रुवारी मध्ये त्यांना मुंबई येथे पुरस्कार मिळाला. अशिक्षितपणामुळे लोकांना आरोग्य विषयी समजावून सांगणे आणि औषधोपचार करणे हे सोपे नसते पण अशाही परिस्थितीवर मात करत पार्वती उसेंडी ह्या आनंदाने आपले काम पार पडत असतात. कठीण परिस्थितीवर मात करत आपले कुटुंब सांभाळत त्या आज पण शिक्षण घेत आहे हे कौतुकास्पद आहे.
तळागाळातील आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या लोकांचा शोध घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा मानस मनाशी बाळगून त्या परिसरातील लोकांची प्रेरणा व्हावी म्हणून प्रमोद साळवे ,जिल्हाध्यक्ष गडचिरोली यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागात योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या पार्वती उसेंडी यांना सेवावृत्ती पुरस्कार त्यांच्या घरी देण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन धोतरे, कपिल चौधरी, निलेश दौडकर आणि मयंक साळवे उपस्थित होते.















