Home महाराष्ट्र कमळी अहिंसामध्ये, जंगी सत्काराने भारावून गेले – अभिनेत्री विजया बाबर

कमळी अहिंसामध्ये, जंगी सत्काराने भारावून गेले – अभिनेत्री विजया बाबर

134

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.23मार्च):- श्री स्वामी समर्थ व कमळी या मालिकेतून अल्पवधीतच महाराष्ट्रातील जनमाणसांत आपल आढळ स्थान निर्माण करणारी विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महिलाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माण तालुक्याची कन्या, सातारा जिल्ह्याची शान मराठी अभिनेत्री विजया बाबर हिचा अहिंसा पतसंस्थेने केलेल्या सत्काराचे उत्तर देताना वरील विधान केले.

      म्हसवड पंचक्रोशीतील देवापूर गावची कन्या व झी मराठी वाहिणीवरील प्रसिद्ध मालिका कमळी या मालिकेतील मुख्य भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्री विजया बाबर यांचा अहिंसा पतसंस्थेच्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: बाबर यांचा नाथ मंदिरा पासून ढोल ताश्यांच्या गजारात वाजत गाजत मिरवणूक काढत संस्थेत स्वागत केले. अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी पैठणी व श्रीफळं देऊन सत्कार करण्यात आला.

    तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया च्या पश्चिमउपाध्यक्ष पदी नुकतीच नेमणूक झालेबद्दल धनंजय पानसांडे यांचाही चेअरमन साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि माण तालुका हि रत्नांची खाण आहे. अनेक रत्न या तालुक्यामध्ये जन्माला आले, चमकले आणि त्यांनी तालुका प्रामुख्याने जिल्हा रोशन केला. तसेच कार्य विजया बाबर हिचे देखील आहे. श्री स्वामी समर्थ मालिकेतुन सुरुवात करून कमळी या मालिकेतून घराघरात पोचलेली कमळी आणि तिचे यश पाहून नक्कीच अभिमान वाटतो. तसेच देवापूर विकास सेवा सोसायटी चे चेअरमन मा. रावसाहेब बाबर यांनी आपल्या मनोगतात भावुक होऊन सांगितले कि आमच्या देवापूर गावामध्ये सुद्धा झाला नाही एवढा भव्य आणि जंगी सत्कार आज नितिन भाई यांचे माध्यमातून अहिंसा पतसंस्थेने केला. त्यामुळे नक्कीच आम्ही भारावून गेलो. 

अहिंसा पतसंस्थेचे कुटुंब प्रमुख व म्हसवड नगरपरिषदे चे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले कि अतिशय कमी वयात देवापूर सारख्या लहान खेड्यातून आलेली व आत्ता संपूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विजया बाबर यांचा अभिनय नक्कीच वाखानण्याजोगा आहे. 

       कमळी मालिका सद्यस्थीतीवर आधारित असल्यामुळे युवावर्गा पासून सर्वांनाच जागरूक करणारी आहे. या मालिकेतील भूमिका अत्यंत छान पणे पार पाडल्यामुळे प्रेक्षकांना त्याची भुरळ पडली आहे. 

आपल्या सत्काराला उत्तर देताना विजया बाबर म्हणाल्या कि माझे अनेक ठिकाणी सत्कार होतात, पुरस्कार भेटतात पण गावच्या मातीत झालेला सत्कार हा माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व एवढा छान आणि जंगी सत्काराने नक्कीच मी भारावून गेले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 आलेल्या सर्व पुरुष व महिलांच्या आग्रहास्तव त्यांनी शिवस्तुती म्हटली. 

या कार्यक्रम प्रसंगी श्रीम.इंदिरा दोशी, सौं राजश्री दोशी, सौं अबोली दोशी, सौं जयश्री व्होरा तसेच संस्थेचे संचालक महावीर व्होरा, अजित मासाळ, बाळासाहेब सरतापे, प्रीतम शहा, नीलिमा गाडे, आणि म्हसवड मधील सुजाण नागरिक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले तर आभार मनोजराव शिंदे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here