Home अमरावती धम्ममय वातावरणात बहरले परिवर्तनवादी कवी संमेलन 

धम्ममय वातावरणात बहरले परिवर्तनवादी कवी संमेलन 

94

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.23मार्च):-बी. आर. ए.नवयुवक मंडळ, रमाई महिला मंडळ,बोधिवृक्ष महिला मंडळ, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने,२१,२२मार्च रोजी दोन दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन खरडगाव ( खळना ) येथे करण्यात आले होते.शनिवार २१मार्च रोजी ,दुसऱ्या सत्रात प्रमुख अतिथी शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे,विद्रोही अविनाश गोंडाने,प्रा.देवानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी पद्माकर मांडवधरे यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी कवी संमेलन पार पडले.

या पार पडलेल्या परिवर्तनवादी कवी संमेलनात सहभागी विदर्भातील प्रख्यात वऱ्हाडी कवी रमेश राऊत यांनी गतकाळातल्या परिस्थितीचा वेध घेणारी, “तेच्यावर झाकून तुया बापाचं फाटक धोतर हाय रे” अशी आशयपूर्ण कविता सादर केली.कवी रिजवान शेख यांनी,”बाबासाहाब महान” ही कविता सादर करताच टाळ्यांचा गजर झाला.कवयित्री कांताबाई सोनोने यांनी पेनाची तलवार ही सुंदर कविता गाऊन सादर केली.जेष्ठ कवी ठवरे गुरुजी यांच्या,”धम्मधर व्हा”या कवितेने मानवी मनाला उजळण्याचा प्रयत्न केला.कवी का. स.राठोड, ज्ञानेश्वर राठोड यांनी आशयपूर्ण कविता सादर केल्या.

यावेळी प्रमुख अतिथी विद्रोही अविनाश गोंडाने यांनी धम्म परिषदेचे महत्व विषद करून,”दाटून खूप आले ढग आकाशात आता” ही मार्मिक गझल सादर केली.शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी “धम्म परिषदेचे आयोजन करणे काळाची गरज आहे,कारण धम्ममय वातावरण हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे असे विचार व्यक्त करीत ,” घटनेमुळे खरी तू झालीस मुक्त नारी” ही गझल सादर करीत खरे स्त्री स्वातंत्र्य अधोरेखित केले.प्रा.देवानंद पाटील यांनी धम्म हा माणूस केंद्रीत आहे असे उपस्थितांना पटवून देत ,एकतेचा ध्यास ही कविता सादर केली तर कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी पद्माकर मांडवधरे यांनी आपले विचार ठेवत त्यांच्या राजधानी या कवितेने कवी संमेलनाची सांगता झाली.

संचालन प्रा.देवानंद पाटील यांनी केले तर आभार नवयुवक मंडळाचे अध्यक्ष हेमराज करवाडे यांनी मानले. या प्रसंगी माजी सैनिक ताराचंद करवाडे यांच्या हस्ते,प्रमुख अतिथी, कवी संमेलनाचे अध्यक्ष तसेच सहभागी कवी यांना पुष्प गुच्छ,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. धम्म परिषदेला यशस्वी करण्याकरिता आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here