Home महाराष्ट्र वृद्ध कलावंत यांनी मानधन मंजूर करण्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही -जिल्हाध्यक्ष...

वृद्ध कलावंत यांनी मानधन मंजूर करण्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही -जिल्हाध्यक्ष श्रीकांत नागदेवे 

116

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.18मार्च):-वृद्ध कलावंत यांनी मानधन मंजूर करण्याकरिता कोणालाही पैसे देऊ नयेत आणि मानधन समिती मधील सदस्य पैशाची मागणी करीत असतील तर त्यांची लेखी तक्रार संघटनेकडे करण्याचे आवाहन

भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी एका पत्रकातून केलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या वृद्ध कलावंतांनी मानधनासाठी अर्ज केले त्यांनी समितीमधील सदस्यांना पैसे देण्याची गरज नाही. कारण आपले अर्ज मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जे कागदपत्र पुरावे आपण दिले ते तपासण्याकरिता जिल्हा परिषद सभागृह येथे प्रत्यक्ष मुलाखती करिता आपणास मुख्य कार्यपालन अधिकारी बोलावून आपण दिलेल्या कागदपत्राची तपासणी करणार आहेत.

आणि जिल्हाधिकारी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्याकडे मानधन मंजुरी करिता पाठवण्यात येतील. मानधन समितीमधील सदस्य कुणीही कलावंत नाही. त्यांना कुठल्याही कलेचा गंध नाही.फक्त आमदार ,खासदार यांच्या मर्जीतील नामधारी आहेत . कलावंतांचे मानधन मंजूर करणे जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. त्याच प्रमाणे सांस्कृतिक विभाग संचालनालय नागपूर विभाग हे आहेत . कलावंतांनी बोगस कलावंत जिल्ह्यात मानधन घेत आहेत.

त्याकरिता आता सर्व अधिकार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांस्कृतिक संचालनालय अधिकारी नागपूर विभाग यांच्याकडे अधिकार देण्यात आलेले आहेत याची नोंद सर्व ऑनलाईन मानधन कलावंत अर्जदारांनी घ्यावी .तसेच वृद्ध कलाकार मानधन समितीच्या सदस्यांनी कुणालाही पैशाची मागणी केली असेल तर तशी लेखी तक्रार कलावंतांनी संघटनेकडे द्यावी जेणेकरून अशा भ्रष्टाचारी सदस्यांवर संघटनेच्या माध्यमातून उचित कारवाई करता येईल असे आव्हान भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत नागदेवी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here