Home महाराष्ट्र लोकसहभागातून सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर….. 

लोकसहभागातून सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर….. 

229

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.16मार्च):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत रावनवाडी /खापा झाली हायटेक…. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि माझी वसुंधरा अभियान आदिशक्ती अभियान अंतर्गत ग्रामपंचायतने सुरक्षितता आणि नियोजनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ग्रामपंचायत रावणवाडी अंतर्गत येणारे रावणवाडी व खापा या दोन्ही गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे चे जाळे उभारण्यात आले असून संपूर्ण परिसर तिसऱ्या डोळ्याच्या नियंत्रणाखाली आला आहे.

गावातील सुरक्षितता अबंधित राखण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे या उपक्रमात लोकसभागातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी ,अंबामाता देवस्थान रावणवाडी निसर्ग पर्यटन केंद्र रावणवाडी, सिद्धेश्वर निसर्ग पर्यटन केंद्र रावणवाडी या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत… या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला व बालकांची सुरक्षितता, ग्रामीण भागातील गुन्हेगारी व नियंत्रण मिळवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हा आहे. 

रावणवाडी/खापा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी रावणवाडी व खापा ही गावे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लोकसभागातून जोडली गेली आहेत त्यामुळे महिला व बालकांची सुरक्षितता ,गुन्हेगारी नियंत्रण सार्वजनिक सेवा सुधारणा आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता यासाठी त्यांच्या निश्चितच फायदा होणार आहे …प्रशासक …सौ.ओमकांता संजय पंधरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here