Home चंद्रपूर दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र व आधार संलग्नीकरण 20 मार्चपूर्वी करावे/प्रशासनाचे आवाहन

दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र व आधार संलग्नीकरण 20 मार्चपूर्वी करावे/प्रशासनाचे आवाहन

130

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.13मार्च):-महाराष्ट्र शासनाच्या 15 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात 1000 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अनुदान थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे देण्यात येत आहे. मात्र या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) ऑनलाइन पोर्टलवर अद्ययावत असणे आवश्यक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनांतील लाभार्थ्यांचे UDID व आधार संलग्नीकरण करण्याबाबत अवर सचिव, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभाग यांच्या 4 मार्च 2026 च्या पत्रानुसार निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत २३० तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 17 लाभार्थ्यांचे UDID व आधार संलग्नीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून कोणताही दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष आवाहन केले आहे.

त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड, आधार क्रमांक व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत गावातील तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत 20 मार्च 2026 पूर्वी जमा करावी. तसेच UDID पोर्टलवरून e-KYC पूर्ण करणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर करून व ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या वाढीव अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here