Home महाराष्ट्र गंगाखेडमध्ये ‘ग्राहक जागरण पंधरवडा’ साजरा करावा- सोपानराव टोले

गंगाखेडमध्ये ‘ग्राहक जागरण पंधरवडा’ साजरा करावा- सोपानराव टोले

151

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13मार्च):-अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा गंगाखेड यांच्या वतीने तालुक्यात १५ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान ‘ग्राहक जागरण पंधरवडा’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत महाविद्यालये, शाळा तसेच शहर व ग्रामीण भागात ग्राहक हक्कांविषयी जनजागृती केली जाणार आहे. पथनाट्य, निबंध स्पर्धा, महिला मेळावे, विविध स्पर्धा तसेच शेतकरी मेळावे अशा माध्यमातून व्यापक जनसंपर्क साधून ग्राहकांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांची माहिती देण्यात येणार आहे.

यावेळी ग्राहक संरक्षण कायदा २०१९, अन्नसुरक्षा, दैनंदिन खरेदी-विक्री व्यवहारातील नियम, तसेच ऑनलाइन व्यवहारांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून कसे सावध राहावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सहभागी होणार आहेत.

या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष गोपाळराव टोले , तालुका अध्यक्ष अभिजित पुरणाळे सचिव ताजोद्दीन सय्यद शहराध्यक्ष मकरंद चिनके महिलाध्यक्ष प्रतिमाताई वाघमारे, उपध्यक्ष मंजुषाताई जामगे, सुधाकर चव्हाण, निरंजन कात्रे, गणेश अवंके महेमूद शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here