Home महाराष्ट्र सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सतरा लेखक कवींच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार 

सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सतरा लेखक कवींच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार 

93

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.11मार्च):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात यंदा राज्यातील सतरा लेखक व कवींच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी नवोदित लेखक व कवींनी संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी केले आहे.

नवोदित लेखक व कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शब्दगंध साहित्यिक परिषदेने हा उपक्रम सुरू केला असून, आतापर्यंत विविध मान्यवरांच्या हस्ते १२६ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुस्तकांचे प्रकाशन होणे हे लेखक आणि कवींसाठी विशेष पर्वणी ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ज्यांची पुस्तके तयार आहेत तसेच ज्यांना आपली पुस्तके प्रकाशित करायची आहेत, अशा इच्छुक लेखक आणि कवींनी संस्थापक व सचिव सुनील गोसावी (मो. ९९२१००९७५०), कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, खजिनदार भगवान राऊत किंवा कार्यवाह भारत गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. जी. पी. ढाकणे, प्रा. डॉ. अनिल गर्जे आणि सुभाष सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here