


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.20फेब्रुवारी):-स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती दिना निमित्त व्याख्यान कार्यक्रम साजरा करण्यात आला. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख सर यांनी शिवाजी महाराजांचे महत्व आणि इतिहासातील वैभवशाली नेत्तृत्व आजच्या नवीन पिढीला कळावे म्हणून व्याख्यानाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील डॉ. मार्गवी डोंगरे, महाविद्यालया चे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सुवर्णा मंगरूळकर, संगणक विभाग प्रमुख सुबोध मेश्राम, रा. से. यो. प्रमुख नंदकिशोर भंडारी, कायदे विषयक जनजागृती सह कार्यक्रम अधिकारी पवन गुजर, हे प्रमुखपणे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालया चे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता सर ह्यांनी केले, तर आभार रा. से. यो. प्रमुख नंदकिशोर भंडारी यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.














