


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
नागभीड(दि.20फेब्रुवारी):- आकाश विद्यालय मेंढा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोमवार, दि. 16 फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात पार पडला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुढील वाटचालीची उमेद दिसत होती, तर शिक्षक व पालकांच्या डोळ्यांत अभिमान आणि भावनांचा संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापिका कु.गोहने मॅडम होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयातील मुख्याध्यापिका संघर्षाशिवाय यश मिळत नाही. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावरच उज्ज्वल भविष्य घडते, असा प्रेरणादायी संदेश प्राचार्य कु.गोहने मॅडम यांनी दिला. तसेच येऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शाळेतील ज्येष्ठ शिक्षक प्रा. पारधी सर, कोहाडे सर, गडपायले सर, परशुरामकर सर, मडावी सर, मेश्राम सर,शिक्षिका कुंभलवार मॅडम, मडावी मॅडम, राणे मॅडम, उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले, कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सुरळीत पार पडले.














