Home महाराष्ट्र गंगाखेड जिल्हा परिषदेच्या भाजपा पाच, एक शिवशेना, एक राष्ट्रवादी

गंगाखेड जिल्हा परिषदेच्या भाजपा पाच, एक शिवशेना, एक राष्ट्रवादी

194

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.9फेब्रुवारी):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी मतदान प्रकिया दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पार पडली तर सर्वांच्या नजरा (दिनाक ९ फेब्रुवारी सोमवार) रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेल्या होत्या त्या सोमवार रोजी पूर्ण झाल्या.गंगाखेड तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांच्या तसेच चौदा पंचायत समिती निवडणुकांचे निकाल सोमवार रोजी नवीन प्रशासकीय इमारत गंगाखेड येथे जाहीर झाले.या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले आहे.तालुक्यातील एकूण सात जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल पाच गटांमध्ये भाजपचे कमळ फुलले असून,उर्वरित दोन गटांमध्ये शिवसेना (धनुष्यबाण)आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये धारासुर गटामधून डॉ.शोभा सुभाष कदम,महातपुरी गटामधून कुशावरता संभाजी पोले,कोदरी गटामधून पार्वती प्रल्हाद मुंडे,गुंजेगाव गटामधून करुणाताई बालासाहेब कुंडगीर,राणीसावरगाव गटामधून अल्ताफ अकबर सय्यद असे एकूण पाच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत तर मरडसगाव गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिल्पा रामराव पाटील व इसाद गटामधून शिवसेना शिंदे गटाच्या सावित्रीबाई राजेश फड विजयी झाले आहेत.

गंगाखेड पंचायत समिती निवडणुक धारासुर गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतापराव कदम मुळी गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नारायण भोसले,महातपुरी गणामधून भाजपाच्या

सुनिता मुलगीर,अकोली गणामधून भाजपचे मनोज मुंडे,मरडसगाव गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद काळे,मालेवाडी गणामधून भाजपाच्या लता गायकवाड,इसाद गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्धवराव सातपुते,माखणी गणामधून भाजपाच्या सारिका खांडेकर,गुंजेगाव गणामधून अपक्ष शांताबाई माने,खंडाळी गणामधून भाजपाच्या सुमन चिलगर, कोद्री गणामधून भाजपाच्या कविता देवकते,बडवणी गणामधून भाजपचे विजय मुंडे,राणीसावरगाव गणामधून भाजपाच्या उषाबाई चव्हाण,पिंपळदरी गणामधून भाजपचे धम्मा पवार विजयी झाले आहेत.भाजपाचे एकूण ९,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४ अपक्ष १ निकाल पाहता पंचायत समितीमध्ये भाजपाचे पूर्ण बहुमत आले आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण शृंगारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली नायब तहसीलदार अशोक केंद्रे,नायब तहसीलदार मोहम्मद अजीज, निवडणुक विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले,मतमोजणी प्रक्रिया तसेच मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील,पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता मतमोजणी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here