


✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.9फेब्रुवारी):- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी लोकनेते विधानपरिषद आमदार डॉ. परिणय फुके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि प्रशासनात्मक वाटचालीत कार्यकारी परिषद ही सर्वोच्च निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाची यंत्रणा मानली जाते.
विद्यापीठातील शिक्षण व्यवस्था बळकट करणे, संशोधनाला चालना देणे, विस्तार शिक्षणाद्वारे शेतकरी व पशुपालकांपर्यंत ज्ञान पोहोचवणे, अभ्यासक्रम विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविज्ञानाशी संबंधित योजनांचे प्रभावी मार्गदर्शन व अंमलबजावणी ही कार्यकारी परिषदेची प्रमुख जबाबदारी असते.
डॉ. परिणय फुके यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासपूर्ण नेतृत्वाचा लाभ विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.














