


▪️नागभीड तालुका पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378
नागभीड(दि.9फेब्रुवारी):- विद्यार्थ्यांनी अपयशावर मात करून पुढे जावे. विद्यार्थ्यांनी यश मिळविण्याकरिता प्रबळ आत्मविश्वास अंगीकारावा. पालकांनी आपल्या पाल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. अनुभवाचे शिक्षण हे आयुष्यात फार महत्त्वाचे असते असे प्रतिपादन नागभीड नगरपरिषदेच्या अध्यक्षा स्मिताताई खापर्डे यांनी नागभीड तालुका पत्रकार संघाद्वारे आयोजित ‘ गुणवंत विद्यार्थी सत्कार ‘सोहळ्यात केले.
नागभीड तालुका पत्रकार संघाचे वतीने सलग 25 व्या वर्षी वर्ग दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा अवॉर्ड संस्था सभागृह येथे नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे स्मिताताई खापर्डे अध्यक्ष नगरपरिषद नागभीड तर प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहल लाड गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड, संजय गजपुरे माजी जि.प सदस्य, प्रा. डॉ. दीपक मोरांडे, घनश्याम बुलबुले प्राचार्य महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तळोधी (बा. ) तसेच नागभीड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. श्याम पाथोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली.
गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात स्नेहल लाड यांनी सांगितले की वृत्तपत्रे समाजाचा आरसा असून इतर क्षेत्राप्रमाणे विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रातही आपले नाव उज्वल करू शकतात. कार्यक्रमातून मिळालेले मोटिवेशन हे तात्पुरते असते ते कायमस्वरूपी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असणे आवश्यक असते. तसेच संजय गजपुरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना चांगले यश संपादित करायचे असेल तर केवळ नियोजन करून चालणार नाही यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगले निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. डॉ.दीपक मोरांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नवीन आदर्श निर्माण करून सत्याची कास धरली पाहिजे. तर घनश्याम बुलबुले म्हणाले की कठोर मेहनत हे खऱ्या यशाचे गमक असते. कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नागभीड नगर परिषदेच्या नवनियुक्त स्मिताताई खापर्डे यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सत्कारमूर्ती गुणवंत विद्यार्थ्यात वर्ग दहावीतील शिव राऊत, वैष्णवी गजपुरे, आर्य सत्य डोंगरे,रजत खेवले, अमन किनेकर क्रिश मुनघाटे, अवंती चौधरी, आरती पिसे, स्नेहल ठवरे,साहिल बिलोने, कुणाल कायरकर, स्नेहल गायकवाड, शिवानी मारभते, सुष्टी माटे, नुपूर मेश्राम, श्रुती बनसोड, सौरभी खंडाळे, तीलोत्तमा खोकले, प्रशांत डहारे, कुणाल वरठी, समृद्धी कांबडी तर वर्ग 12 वी तील गुणवंत विद्यार्थी फाल्गुनी भोयर, ऋतुजा वलथरे, सानिया माहूरले, विहम लोणारे, शिवानी सावसागडे , श्वेता चौधरी, गणेश सावसाकडे, माधुरी सहारे, अवंतिका सोनवणे, साक्षी आंबोरकर, हिमांशू देशमुख, डिंपल उईके, प्राची शेंडे, श्रुती अमदाबादी, संजना ननावरे गायत्री खंडाळे, आचल रहाटे, प्रणय कोडापे, मानसी जांभुळे, सलोनी देशमाने, शिवम नैताम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागभीड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. श्याम पाथोडे यांनी केले. प्रस्ताविकातुन कार्यक्रमाची भूमिका विषद करण्यात आली. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मेश्राम यांनी केले तर कोष्याध्यक्ष यशवंत निकुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, पालक,गावातील प्रतिष्ठित नागरीक व पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.














