Home महाराष्ट्र राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वडगाव स्टे.येथे जागरूकता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वडगाव स्टे.येथे जागरूकता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

175

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-डॉ.सुभाष पवार (तालुका आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 2025 सालची कुष्ठरोग शोध मोहीम जि.प. के.प्रा.शाळा वडगाव स्टे येथे राबविण्यात आली.या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये कुष्ठरोगाविषयी जागरूकता निर्माण करणे व रोगाचे लवकर निदान याबाबत माहिती पोहोचवणे हा होता.याप्रसंगी डॉ.वैशाली देवसरकर यांनी कुष्ठरोगाची कारणे,लक्षणे,निदान पद्धती,उपचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. रोगाबद्दलची समाजातील गैरसमजुती दूर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

डॉ.देवसरकर यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग छूत नसून उपचारयोग्य असल्याचे सांगत, लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.या मोहिमेत आरोग्य कर्मचारी वैभव उत्तरवाड व बाळासाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी केली तसेच गावकऱ्यांना मोफत तपासणीबाबत माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजना आणि शासकीय सोयींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामेश्वर बचाटे, मुख्याध्यापक मारुती रामराव तिडके, तसेच शिक्षक राजू गोविंद सगरे आणि सोमीनाथ फड उपस्थित होते. त्यांनी अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.गावातील नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कुष्ठरोग निर्मूलनाबाबत प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या यथोचित उपस्थितीमुळे मोहीम प्रभावीपणे पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here