Home चंद्रपूर भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीने बसस्थानक येथे भव्य महाप्रसाद वितरण

भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीने बसस्थानक येथे भव्य महाप्रसाद वितरण

157

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.23नोव्हेंबर):-श्री सत्य साईबाबा भगवान यांच्या 100 वर्षे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीने आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवले जात असून शनिवार दिनांक 22 नोव्हेंबरला भंडारा बस स्थानक येथे भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रम पार पडला.

महाप्रसाद वितरण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये साईराम भक्तांनी सहभाग घेतला असून जवळपास 2000 पेक्षा जास्त भाविकांनी तसेच प्रवाशांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सकाळी 09:30 वाजता श्री सत्यसाई बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. महाप्रसादात सर्वांना पोटभर खाण्याची मुभा होती तसेच गोड पदार्थ सुद्धा देण्यात आले.

भंडारा जिल्हा संघटनेच्या वतीने दिनांक 16 नोव्हेंबर पासून दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत साई सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यात रोजच ओंकारम, सुप्रभातम, वृक्षारोपण, वैद्यकीय सेवा, गौसेवा, भजन सेवा, भजन साधना, महिला सुरक्षा मार्गदर्शन, मंदिर परिसर स्वच्छता, पशुवैद्यकीय सेवा, नारायण सेवा, पालखी सोहळा तसेच जन्मसोहळा, सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सप्ताहाच्या आयोजनाकरिता भंडारा जिल्हाध्यक्ष धनराज माहुले, यशवंत टिचकुले, शामराव ठोंबरे, रवींद्र नागपुरे, प्रमोद पवार, रविशंकर साकोरे, सतीश करंजेकर, वासूजी चावरे, मधुकर गायधने, प्रकाश चाचरे, वैभव सूर्यवंशी, आशिष खेडेकर, श्रीवंत तितिरमारे, शुभम मानकर, भारती सार्वे, पौर्णिमा नागपुरे, संगीता गायधने, रश्मी करंजेकर, योगिता टिचकुले, प्राची देशपांडे, श्री. चवडेजी (वेल्डिंग शॉप) आणि सर्व सत्यसाई परिवार भंडारा जिल्हा यांनी खूप मेहनत घेतली.
————
भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीने मानव जातीसाठी तसेच धरती मातेच्या संवर्धनासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम वर्षभर मेहनत घेऊन राबविले जातात, साई सप्ताहाच्या निमित्ताने गोरगरिबांची सेवा, आरोग्य सेवा, गौसेवा, वृक्षारोपण, महिलांना मार्गदर्शन तसेच महाप्रसाद वाटप केले जाते, साई सप्ताहाच्या निमित्ताने सर्व भक्तांना धन्यवाद !
*-डॉ.अक्षय कहालकर, कहालकर दुःखनिवारक क्लिनीक भंडारा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here