Home महाराष्ट्र भिमशाहिर प्रबोधनकार सदानंद मोरे यांना त्यागमूर्ती रमाई गौरव पुरस्कार 2025 वर्धा येथे...

भिमशाहिर प्रबोधनकार सदानंद मोरे यांना त्यागमूर्ती रमाई गौरव पुरस्कार 2025 वर्धा येथे सन्मानित

105

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.13नोव्हेंबर):-वर्धा ऑडिओ टॉनिक साऊंड लाईट प्रतिष्ठान कवी के .पाटील द्वारा आयोजित दिवंगत मंदाताई के पाटील यांच्या स्मरणार्थ दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोज सोमवारला संध्याकाळी सहा वाजता विजया हॉल सांगवी मेघे वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला .अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा येथील भीम शाहीर प्रबोधनकार सदानंद मोरे यांना रमाई गौरव पुरस्कार 2025 सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्राचे भिमशाहिर प्रबोधनकार प्रदीप कडबे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा, प्रबोधनकार सुभाष कोठारे ,महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका प्रबोधनकार निशा धोंगडे ,महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका प्रमोदिनी साठे,महाराष्ट्राचे कवी गायक संगम कासारे ,सुप्रसिद्ध गायिका वैशाली शेंडे, सुप्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित, सुप्रसिद्ध गायक क्रांती मिलन ,सुप्रसिद्ध गायक दिलीप शिंदे, सुप्रसिद्ध कवी गायक राजेश भारती, सुप्रसिद्ध गायिका योजना उकंडकर, गायिका मंदा वाघमारे, महाराष्ट्राची सुप्रसिद्ध कवी गायक दयानंद इंगळे ,जितू चव्हाण ,शिवाजी कांबळे, प्रबोधनकार मधुबावन लंकार, तेलंगणा सुप्रसिद्ध गायक अरुण मेश्राम, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी के पाटीलने यांनी कलावंताचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळीमोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here