Home महाराष्ट्र नवीन टाकळी आयटीआय समोर भंडारा येथे सुपर बस थांबा द्या -विद्यार्थी व...

नवीन टाकळी आयटीआय समोर भंडारा येथे सुपर बस थांबा द्या -विद्यार्थी व पालकांची मागणी

129

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.13नोव्हेंबर):-औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय नवीन टाकळी भंडारा येथे सुपर बस चा थांबा नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते .त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी ग्रामीण भागातून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर मुले ,मुली शिक्षणाकरता येत असतात. परंतु या ठिकाणी सुपर बसचा थांबा नसल्याने सायंकाळी 4 वाजेनंतर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

विद्यार्थ्यांची शाळा सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते परंतु बस वेळेवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना एक तास पूर्वीच ४वाजेच सुट्टी दिल्या जाते. परंतु ४ वाजे नंतर सुद्धा सुट्टी दिल्यानंतर बस ५.३० ते ५ च्या दरम्यान त्या ठिकाणी कोणती सुपर बस थांबत नाही.

त्यामुळे ३० ते४० किलोमीटर अंतरावर विद्यार्थ्यांना स्वगावी जाताना रात्रीचे ९.३० वाजत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन टाकळी या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन कमी जास्त झाल्यास याला जबाबदार कोण असेल ?त्यामुळे एसटी महामंडळाचे विनंती आहे की, त्यांनी नवीन टाकळी या ठिकाणी सुपर बस चा थांबा देऊन विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास थांबवावा अशी विद्यार्थी त्याचप्रमाणे पालकांची सुद्धा मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here