


✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.३नोव्हेंबर):- वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपन कास्ट प्रकल्पातील कार्यशाळा विभागातील ज्येष्ठ कर्मचारी गणेश बेले यांना सेवानिवृत्ती निमित्त 31 ऑक्टोबर रोजी सहकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी कार्यशाळा परिसरात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास उत्खनन विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. संतोष सर, नवीन सर, फोरमन कपाट सर, तसेच सत्कारमूर्ती गणेश बेले उपस्थित होते. सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रामाणिक सेवा, समर्पणभाव आणि संस्थेच्या प्रगतीस दिलेल्या योगदानाबद्दल कौतुकाची थाप देत त्यांचा सत्कार फुलांचा गुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी गणेश बेले यांचे कार्यनिष्ठ, जबाबदार आणि सहकार्यशील व्यक्तिमत्त्व संस्थेसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांनी दीर्घ सेवाकाळात सहकाऱ्यांमध्ये एकात्मता व आपुलकीचे नाते जपले असल्याचेही नमूद करण्यात आले.
शेवटी गणेश बेले यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि संस्थेच्या प्रगतीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग्य पद्धतीने प्रवीणजी द्वारा करण्यात आले यावेळी बहुसंख्य उत्खनन विभागातील कामगार उपस्थित होते.














