


अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी, मो. 86985 66515
गंगाखेड – येथील कै सौ शेषाबाई सीताराम मुंढे महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ या सदरांतर्गत यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःच्या मेहनतीने जे स्वावलंबी झाले आहेत अशा माजी विद्यार्थ्याचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश खोकले, ज्याने मेहनतीच्या जीवावर मुंबई पोलीस दलामध्ये नोकरी मिळवली आहे. त्याने आपले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित तासिका झाल्यानंतर भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन घ्यावे, त्यांनी सुचवलेल्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा. तसेच शरीर निरोगी राहावं म्हणून व्यायाम सुद्धा करणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगात यश प्राप्तीसाठी वेळेचे नियोजन व मेहनत अत्यंत गरजेची आहे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ सुभाष यादव हे होते, सूत्रसंचालन प्रा डॉ रेखा बने यांनी तर प्रा डॉ राजीव आहेरकर यांनी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.














