Home अमरावती जिजामाता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न

जिजामाता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न

157

 

अमरावती ( प्रतिनिधी )
येथील जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मोर्शी येथे दि.१४ सप्टेंबर २०२५ ला राष्ट्रीय भाषा हिंदी दिवस संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.सुधीर सवाई,प्रमुख अतिथी हिंदी विषयाचे शिक्षक श्री शैलेश ठाकरे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर अतिथिंनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य श्री सुधीर सवाई ,प्रमुख अतिथी श्री शैलेश ठाकरे व शिक्षक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतील पुस्तकांचे वाटप केले आणि ‘मन की भाषा हिंदी भाषा, प्रेम की भाषा हिंदी भाषा,राष्ट्र की भाषा हिंदी भाषा ‘ अशा हिंदी दिवसानिमित्त घोषणा देऊन हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here