Home महाराष्ट्र भारतीय बौध्द महासभा शाखा माण तालुक्याच्या वतीने सभासद नोंदणीस सुरुवात जास्तीत...

भारतीय बौध्द महासभा शाखा माण तालुक्याच्या वतीने सभासद नोंदणीस सुरुवात जास्तीत जास्त धम्मबांधवानी सभासद नोंदणी करावी : अध्यक्ष अरविंद बनसोडे

225

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड : भारतीय बौध्द महासभा तथा दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया यां माण तालुका शाखेच्या वतीने सभासद नोंदणी चालू झाली असून माण तालुक्यातील जास्तीत जास्त धम्म बांधवानी आपली वार्षिक 20/- रुपये, क्रियाशील सभासद 100/- रुपये पाच वर्षासाठी आणि आजीवन सभासद 1000/-सभासद फी भरून आजीवन सभासद होण्याचे आवाहन भारतीय बौध्द महासभा शाखा माण तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे यांनी केले.
या संस्थेची स्थापना करण्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की, भारतातील लोकांमध्ये बौद्ध धर्माची तत्त्वे रुजावीत आणि त्याद्वारे सामाजिक समानता आणि मानवी मूल्यांची स्थापना व्हावी.
यां संस्थेची उद्दिष्टे बौद्ध धर्माचा प्रसार : गौतम बुद्धांनी दिलेले बौद्ध तत्त्वज्ञान आणि मानवी मूल्यांचा समाजात प्रचार करणे.
सामाजिक आणि नैतिक शिकवण:समाजात सामाजिक आणि नैतिक मूल्यांची शिकवण देऊन जागरूकता निर्माण करणे.
बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन:
आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतात बौद्ध धर्माला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करणे.
जागरूकता आणि संघटन:
बौद्ध अनुयायांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि त्यांच्या हितासाठी एकत्र आणणे.
मानवाधिकार आणि समता:
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मैत्री या बौद्ध तत्वांना प्रोत्साहन देणे हे असून तालुक्यातील सर्व धम्म बांधवानी आपल्या कुटूंबातील लोकांना वार्षिक अथवा आजीवन सभासद करून घ्यावे असे अरविंद बनसोडे यांनी सांगितले आहे.
अरविंद बनसोडे, अध्यक्ष , पिंटू बनसोडे(खडकी ), श्रीमंत भोसले(वावरहीरे ), बाळासाहेब सरतापे गुरुजी(हिंगणी ), सचिन सरतापे(म्हसवड ), आबासाहेब बनसोडे (धुळदेव ), सिद्धार्थ जयवंत बनसोडे(वरकुटे मलवडी ), कुमार सरतापे(म्हसवड), डॉ. संभाजी सावंत(पळशी ), अमर खरात(मलवडी ), जितेंद्र सावंत, वसंत भोसले(वावरहिरे ), सुनील भोसले(शिंगणापूर), आदिनाथ शिंदे, (पळशी ) यांचेकडे सभासद फी भरून आपले सभासदत्व पूर्ण करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here