Home अमरावती प्रा.बुंदेले यांनी अंध मुलींना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन शिक्षक दिन केला साजरा

प्रा.बुंदेले यांनी अंध मुलींना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन शिक्षक दिन केला साजरा

276

 

अमरावती ( प्रतिनिधी )
“राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी आपल्या पदाचा उपयोग समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केला. सेवानिवृत्तीधारकांचा, समाजातील मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे जीवन मोदमय करतात.राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजबांधवांना अनेक योजनांचा लाभ मिळवून देतात. सहा वर्षापासून जिल्हाध्यक्षपदावरील चांगले काम पाहता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री मा.बबनराव घोलप साहेब यांनी सातव्यांदा त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. हीच खरी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती आहे. समाजातील पीडित कुटुंबाला न्याय देण्याचं महान काम ते करतात.समाजातील अशा या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे मी अभिष्टचिंतन करतो.श्री पी. आर.पाटील यांनी अंध मुलींचे वसतीगृह स्थापन करून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे.अंध शिक्षक असून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना व वसतीगृहातील अंध विद्यार्थीनींना घडविले आहे. अशा या आदर्श
व्यक्तिमत्त्वाला मी सलाम करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.”असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते श्री पी.आर.पाटील अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था, वडाळी जि.अमरावती येथे दि.५ सप्टेंबर २०२५ ला शिक्षक दिनी कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री निलेश रमेशराव जामठे यांचे अभिष्टचिंतन व महिंद विद्यालय,काँग्रेस नगर येथील विशेष शिक्षक व अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदर्श शिक्षक श्री पी.आर.पाटील यांचा शिक्षक दिनानिमित्त करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,(अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ), सत्कारमूर्ती श्री पी.आर.पाटील व श्री निलेश जामठे तथा संस्था सचिव मुकेश जोगेकर ,सौ.मंदाताई पाटील, सौ.प्रीती जोगेकर,सौ.दीक्षा जोगेकर यांची विशेष उपस्थिती होती.
सत्कारमूर्ती श्री पी.आर. पाटील व सत्कारमूर्ती श्री निलेश जामठे यांचा कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले व समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी शाल,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व प्रा.बुंदेले लिखित “आदर्श अभ्यासाचे तंत्र” हे पुस्तक देऊन सत्कार करून अभिष्टचिंतन केले व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
अंध विद्यार्थिनींना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले यांनी ‘शिक्षक दिन साजरा केला.व शिक्षक कसा असावा?’ व ‘आदर्श गुरुजी’ या स्वरचित अभंगाचे शिक्षक दिनानिमित्त गायन केले.
याप्रसंगी अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले,प्रमुख अतिथी समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,संस्था सचिव श्री मुकेश जोगेकर,सत्कारमूर्ती श्री पी.आर.पाटील व श्री निलेश जामठे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला कु.प्रांजली जोगेकर,कु.श्वेता जोगेकर,चि. विकास जोगेकर,चि.विराज जोगेकर व अंध विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here