Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात असंसर्गजन्य रोग तपासणी आणि अनीमिया वर कार्यशाळा संपन्न

ग्रामगीता महाविद्यालयात असंसर्गजन्य रोग तपासणी आणि अनीमिया वर कार्यशाळा संपन्न

166

 

चिमूर – ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती, रेड रिबन क्लब आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, जांभुळघाट, यांच्या संयुक्त वतीने “असंसर्गजन्य रोग तपासणी आणि अनीमिया” यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. करिये, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डॉ. जयश्री मेश्राम, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, कु. आचल हेमने, लॅब टेक्निशियन, श्री. शुभम चौधरी, आरोग्य सेवक तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. करिये यांनी असंसर्गजन्य रोग काय असते व त्याचे निवारण कशा प्रकारे करता येईल याबद्दल माहिती दिली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आले. या तपासणीमध्ये रक्तदाब, हिमोग्लोबिन व रँडम ब्लड शुगर सारख्या चाचण्यांच्या समावेश होता.
अंदाजे 100 विद्यार्थ्यांनी या वैद्यकीय तपासणीच्या लाभ घेतला. या कार्यशाळेचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे महिला तक्रार निवारण समितीचे समन्वयक, प्रा. सरताज शेख आणि रेड रिबन क्लब समन्वयक, डॉ. निलेश ठवकर यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here