Home महाराष्ट्र विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

134

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

तालुक्यातील व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गावाचे,शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी गंगाखेड शहरातील डॉ. के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटर आणि भार्गव करिअर अकॅडेमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा २०२५ शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे.
आयोजित सोहळ्यामध्ये यावर्षी वैद्यकीय, अभियांत्रिकी,तसेच विविध उच्च शिक्षण क्षेत्रांत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटर आणि भार्गव करिअर अकॅडेमी नांदेडच्या वतीने सन्मान होणार आहे. त्यामागे अथक परिश्रम घेणाऱ्या पालकांचाही गौरव करून त्यांच्या कष्टांना योग्य दाद देण्यात येणार आहे.दिनांक २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी 4:00 ते 6:00 या वेळेमध्ये मोरया फंक्शन हॉल,डॉक्टर लेन येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.के.पी.गाराळे एज्युकेशन सेंटरचे चेअरमन डॉ.के.पी.गारोळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सेंटरच्या संचालिका सौ.किरण गाराळे असणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांची उपस्थिती आहे.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक भार्गव करिअर अकॅडेमी नांदेडचे डायरेक्टर प्रा.भार्गव राजे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांना यशाचा सन्मान मिळावा आणि त्यांच्या पालकांना समाजासमोर अभिमानाने उभे राहता यावे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असून समाजातील इतर विद्यार्थी व पालकांनाही प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम खुले स्वरूपात ठेवण्यात आला आहे.आयोजकाच्या वतीने सर्व पालक,विद्यार्थी व ग्रामस्थांना सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावेल व शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक बनेल,असा विश्वास डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here