Home पुणे श्याम ठाणेदार यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार !

श्याम ठाणेदार यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार !

226

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

  पुणे(दि.26मे):- नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आणि पुण्यातील टॅलेंट कट्टा ( अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संलग्न ) संस्थेतर्फे महाराष्ट्रातील स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्ररत्न हा महाराष्ट्रातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. २५ मे रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार देण्यात आला. २५ मे रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते श्याम ठाणेदार यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सौ. अश्विनी जाधव संस्थापिका व्हायब्रंट सोशल फाऊंडेशन, श्री नितीन धवणे पाटील ( प्रसिद्ध उद्योजक मुंबई ) श्री जितेंद्र तुळशीराम दाते ( चेअरमन एआरजे ग्रुप ऑफ इंडस्ट्री ), डॉ नीता दोषी (प्रसिद्ध शास्त्रज्ञ संशोधन कृत्रिम पाऊस ) श्री दीपक जाधव ( संस्थापक अध्यक्ष टॅलेंट कट्टा ) आदी मान्यवर उपस्थित होते. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध स्तंभ लेखक असून महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात ते नियमितपणे स्तंभ लेखन करतात.

महाराष्ट्रभर त्यांचा वाचक वर्ग आहे. श्याम ठाणेदार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रबोधनात्मक लेखन कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्तंभ लेखनातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळाल्याने श्याम ठाणेदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here