Home महाराष्ट्र जामनेर तालुका मागास का राहिला ?

जामनेर तालुका मागास का राहिला ?

513

जामनेर तालुक्यातील शेतकरी बहुसंख्य मराठा आहेत.मोठी शान समजतात.पण मराठा असल्याचे दाखवत नाहीत.जन्माने मराठा आहेत, कर्तृत्वाने नाहीत.राजपूत सुद्धा खूप आहेत.पण तसे दाखवत नाहीत.फक्त आडनाव लावून किंवा सांगून मिरवतात.

मला वाटते या लोकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.ज्ञान कमी आहे.हिंमत कमी आहे.भय जास्त आहे.कधी आवाज काढला तर गिरीश भाऊ नाराज होतील.आपले होणारे काम. बिघडवतील.सरकारी कामात टांग अडवतील.पोलिसांना सांगून खोटे केसेस करतील.आपसात भांडणे लावतील.

भीती खरी असली तरीही किती काळ भयभीत राहावे? कधीतरी मैदानात उतरले पाहिजे.कोणी मंडप टाकला, भंडारा केला तर खुप मोठी गर्दी होते. पण कोणी सरकार दरबारी तक्रार नेली कि मिस्टर इंडिया होतात. तरीही जातीचा टेंभा मिरवत असतील तर ते पोकळ वाटते.

जामनेर तालुक्यातील अनेक गावात फिरलो.संपर्क केला.चर्चा केली. तर कळले कि गावातील एकाच जाती जमातींमध्ये वाद जास्त आहेत. भाऊबंदकी मधे भांडणे आहेत.नितीमत्तेचा अभाव आहे.म्हणून कोणी कोणाची शेती अतिक्रमण करतो. कोणी जमीन अडकवून ठेवतो.कोणी दुधात पाणी टाकतो. कोणी अनुदान घेतांना चुगली करतो.त्यामुळे येथील गावकरी आणि शेतकरी पोलिस, कोर्ट, भुमि अभिलेख, पंचायत समिती मधे जास्त हेरझारा घालतात. खूप पैसा वाया घालवतात.दूध फेडरेशन मधे आपल्याच गावातील, आपल्याच नात्याफाट्याचे लोक दूध चोरून पाणी टाकतात. काही तर चक्क दहा दहा लिटर दूध चोरतात. कारण नितीमत्तेचा अभाव आहे. ज्ञानाचा अभाव आहे.गावात मंदिरे आहेत पण धर्म नाही. न्याय निती नाही.

म्हणून जामनेर तालुक्यातील पोस्टींग साठी नोकर आणि अधिकारी लाईन लावून ,हातात पैसा घेऊन उभे असतात.लोक अशिक्षित असल्यामुळे सहज लुटता येते.बक्कळ पैसा कमवता येतो.मंत्रीला हप्ते देऊन संरक्षण घेता येते.कोणताही अधिकारी किंवा नोकर कधीच वेळेवर काम करीत नाहीत.

याबाबत मी स्वतः गिरीश महाजन यांना समक्ष भेटून सांगितले.ते फक्त हो हो म्हणतात.पण काम करीत नाहीत.कोणालाही मदत करीत नाहीत.ते फक्त अधिकाऱ्यांना आणि नोकरांना मदत करतात.शेतकऱ्यांना मुळीच मदत करीत नाहीत.म्हणून जामनेर तालुक्यातील शेती सुपीक असूनही शेतकरी कंगाल बनला आहे.मराठा, राजपूत असूनही शुद्र बनला आहे.बोलण्याचे,लढण्याचे बळ उरलेले नाही.खच्चीकरण झालेले आहे.आपली पोळी शेकण्यासाठी आपलाच भाऊ, शेजारी, गावकरी, नातेवाईक चुलीत घालायला लाजत नाहीत.

जामनेर तालुक्यातील दोन चार शिकलेले लोक आहेत.पण ते सुद्धा सिझनल काम करतात.निवडणुक जवळ आली कि मोर्चा काढतात, जेवणावळी चालवतात.पक्षाची उमेदवारी मिळाली तर लढतात.नाही मिळाली तर मुतून झोपी जातात. पुढील निवडणूक येईपर्यंत.

मी जामनेर तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांना भेटतो. क्वचित एखादा इमानदारीने काम करतो.आधिकतम अधिकारी तर शिकार समजून वखवखलेल्या नजरेने पाहातात.जसा लांडगा बकरीकडे पाहातो.

हा सर्व प्रकार मी स्वतः गिरीश महाजन यांना सांगितला.पण ते भाऊ वेगळ्याच नादात असतात.तिकडे पहलगाम,आसाम,केरळ मधे पिस्तूल घेऊन जातात.लोक म्हणतात,संकट मोचन. पण स्वताच्या मतदारसंघात वेळ देत नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सरकारी कार्यालयात जात नाहीत. मला संशय येतो, त्यांची काहीतरी गोची झालेली असावी.जर शेतकरी सोबत गेलो आणि अधिकारी वर रूबाब केला तर ते अपमान तर करणार नाहीत. कुठेतरी पाणी मुरते?जे पाणी टेबलावर दिसलें पाहिजे ते टेबलाखालून वाहात असावे.

जामनेर तालुका अशिक्षित लोकांचा आहे. म्हणून तेथे अंधी बहिरी चालते. यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.हे काम डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक यांनी केले पाहिजे.पण ते सुद्धा कुठेतरी भयभीत अवस्थेत जगत आहेत. स्वताची गोंधळी सांभाळून आहेत. दोरीला साप समजून भीत आहेत.

✒️शिवराम पाटील(९२७०९५३१२२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here