Home महाराष्ट्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

131

 

गंगाखेड :-
महाराष्ट्र हा संत, महात्मे, महापुरुष यांच्या त्याग समर्पण आणि बलिदानातून निर्माण झाला असून आज आपल्या मुला मुलींना या महामानवाचे राष्ट्रनिर्माणाचे अलौकिक कार्य ज्ञात व्हावे व त्त्यांच्या पाऊलखुणा जपता याव्यात याकरिता सुसंस्काराचे बीज त्यांच्या सुपीक मेंदूत पेरता यावे यासाठी (दि.१२ एप्रिल शनिवार) रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सक्सेस कोचिंग क्लासेस व तालुका वकील संघाच्या वतीने गंगाखेड तालुकास्तरीय निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गंगाखेड तालुक्यातील सर्व विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपली कौशल्य आणि क्षमता तपासून घ्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.आयोजित निबंध स्पर्धेत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,आभाळाएवढा छत्रपती राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतीबा फुले यांचे जीवन आणि कार्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य, भारतीय संविधानाची गरज आणि महत्त्व अशा विविध विषयांवर निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न होणार असून निबंध स्पर्धा स्पर्धेची वेळ सकाळी ठिक ११ वाजता सामान्य ज्ञान परीक्षा दुपारी ठिक १ वाजता होणार असून या स्पर्धा शहरातील डॉ.लेन,ओम शांती भवन समोर,सक्सेस क्लासेस गंगाखेड येथे संपन्न होणार आहेत. सदरील स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन सक्सेस क्लासेसचे संचालक प्रा.महादेव सुरनर ९८२२०७४४९९,प्रा.जगदीश मंदोडे ८८८८९६७३६६,प्रा.महादेव केंद्रे ९४०३२२२६२२ यांच्यासह तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मिलिंद क्षिरसागर,उपाध्यक्ष ॲड.प्रसाद शेटे, सचिव ॲड.प्रल्हाद डमरे,सहसचिव ॲड.भुषण साळवे,कोषाध्यक्ष ॲड.संतोष मुंढे तसेच सर्व विधिज्ञ आणि सक्सेस क्लासेसचे शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here