Home चंद्रपूर नेवाजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे महात्मा फुले जयंती साजरी

नेवाजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे महात्मा फुले जयंती साजरी

370

 

रोशन मदनकर (उपसंपादक, मो. 88886 28986)

ब्रह्मपुरी : नेवाजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि शेतकरीहितैषी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य के. एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक श्री. एन. डब्ल्यू. नाकाडे, पर्यवेक्षक श्री. पी. आर. जिभकाटे, ज्येष्ठ शिक्षक बगमारे सर, मराठे मॅडम, वदनलवार सर, पराते सर, बारापात्रे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय के .एम. नाईक सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना त्यांच्या समाजसुधारणेतील योगदानाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.वर्षा सातपुते मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन अतिशय शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here