


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.26मार्च):- म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने अनेक वर्षापासुन असलेले थकीत गाळे भाडे वसुलीसाठी पाच गाळे सीलबंद केल्याची कारवाई मुख्याधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी 24 मार्च रोजी केली.
म्हसवड नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये म्हसवड नगरपरिषद मालकीचे १२ शॉपिंग सेंटर असून, या शॉपिंग सेंटरमधील गाळाधारकांचा बऱ्याच वर्षांपासून गाळा भाडे भरत नसल्याबाबत प्रश्न प्रलंबित होता. नगरपरिषद मालकीचे एकूण गाळे १२७ असून, सर्व गाळाधारक यांना थकीत गाळा भाडे भरणेकरिता 7 दिवसांची मुदतीची अंतिम नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ रोजी
गाळाधारक यांच्यावरती धडक वसुलीची कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सर्व गाळ्यांची वसुली रक्कम १ कोटी ५ लाख इतकी वसुली नगरपरिषदेमार्फत करण्यात आली आहे. कारवाईच्या अनुषंगाने पाच गाळे सीलबंद करण्यात आले आहेत. कारवाईस मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत कार्यालय अधीक्षक अविराज पाटील, स्वच्छता निरीक्षक सागर सरतापे यांनी पथकप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन लोखंडे, प्र. सहायक कर निरीक्षक शुभांगी माळी, सहायक कार्यालय अधीक्षक-२ रूपाली माडकर, कनिष्ठ अभियंता सूरज पवार, यश कोरूचे, सुनील माडे, संजय जाधव, शुभम चव्हाण, रोहित बारवासे उपस्थित होते.














