Home महाराष्ट्र नागपूर दंगलीची एसआयटी मार्फत चौकशी करा

नागपूर दंगलीची एसआयटी मार्फत चौकशी करा

248

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.26मार्च):- नागपूरमध्ये दोन समाजामध्ये दंगल घडली या दंगलीची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी गंगाखेड येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दि.24 मार्च सोमवार रोजी गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी नागपूर मध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत जमावाने दंगल घडवली परंतु मुख्य आरोपींना सोडून येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने निर्दोष नागरिकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत अनेक युवकांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करत मोहल्यातील गाड्यांची तोडफोड करत त्यांना उचलण्याचे कार्य पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

या दंगलीमध्ये निरपराध इरफान अन्सारी या मुस्लिम युवकाचा नाहक मृत्यू झाला असून या युवकाच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी तसेच दंगलीची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी ही करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर अमजद पठाण,खुरम चाउस,सय्यद खिजर,सलमान पठाण,सय्यद वसीम,सद्दाम शेख,जुबेर शेख,समीर शेख,सय्यद याकुब,शेख सिराज,शेख मजहर,फारोक पटेल,बबलू पठाण,शेख रसूल,हज्जू पठाण,गितेश कांबळे,शेख मोईस, सय्यद अजिज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here