Home महाराष्ट्र सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी स्व. सौ वेणूताई चव्हाण यांचा आदर्श महत्त्वाचा – मा. सौ....

सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी स्व. सौ वेणूताई चव्हाण यांचा आदर्श महत्त्वाचा – मा. सौ. सुनंदा राजेंद्र पवार(बारामती)

285

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.15मार्च):-“प्रत्येकाला कर्तृत्व सिद्ध करून यश मिळविण्याची उमेद असते. यासाठी आपल्यासमोर आदर्श असावा लागतो. तो आदर्श म्हणून स्व.सौ. वेणूताई चव्हाण व यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समाजाने घेण्याची आज नितांत गरज आहे. तसेच सर्वांनी स्वतः आनंदी, सुखी, समाधानी जीवन जगावे व दुसऱ्यांनाही हे सुख आनंद मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करावा. समाजाने एकत्रितपणे महिलांना समान संधी, आदर आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया की आपण महिलांच्या हक्कांचे रक्षण करू आणि समान समाज निर्माण करू.” असे प्रतिपादन मा. सौ. सुनंदा राजेंद्र पवार (वहिनी) विश्वस्त, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी केले.

त्या श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्ताने कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील (साहेब) माजी सहकार व पणनमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सातारा जिल्हा, अध्यक्ष, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, कराड, कार्यकारी विश्वस्त, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड हे होते 

     मा. सौ. सुनंदा पवार पुढे म्हणाल्या की, “स्व.सौ. वेणुताई चव्हाण यांचे समाज जीवनामध्ये खूप मोलाचे योगदान राहिलेले आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांची सुरुवात कर्तुत्वान महिलांचा सन्मान करून केली जात आहे, हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कर्तुत्वान महिलांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि एकूणच आत्मनिर्भरतेसाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण, वृक्ष लागवड, जलसंधारण, आई-वडिलांची सेवा, नात्या नात्यातील संवाद, तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर या अनुषंगाने महिलांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. हे कार्य या कर्तुत्वान महिलांनी करावे.”

    याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. श्री बाळासाहेब पाटील म्हणाले की,  स्व. सौ. वेणूताई चव्हाण आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्य व कर्तृत्वाचा वसा जोपासण्यासाठी आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून असे उपक्रम राबविणे महत्वाचे आहे. स्व. वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी निमीत्ताने वर्षभर असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.”

     याप्रसंगी कराड परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्रशासकीय, वैद्यकीय, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, राजकीय, कृषी, पशुधन, स्वच्छता, साहित्य, आध्यात्मिक, लोककला, न्यायपालिका, उद्योजकता, सहकार, बचतगट, पत्रकारिता, नृत्य, अभिनय, क्रीडा इत्यादी क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या 39 कर्तुत्वान महिलांचा सन्मान प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्प, देऊन करण्यात आला.

      याप्रसंगी व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्लासाहेब, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष मा. श्री जयंत पाटील (काका), सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाडचे खजिनदार श्री. नंदकुमार लक्ष्मणराव बटाणे, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे विश्वस्त व सदस्य श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका), मा. दिलीपभाऊ चव्हाण, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे संचालक मा. श्री चंद्रकांत हिंगमिरे, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे खजिनदार संजय बदीयानी, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर सौ. संगीता साळुंखे (माई), डॉ. सौ. सविता मोहिते यांनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य प्रा. (डॉ.) श्रीमती स्वाती सरोदे  यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. (डॉ.) श्रीमती मृणालिनी शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार मा. श्री. नंदकुमार लक्ष्मणराव बटाणे विश्वस्त व सदस्य, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एस. पी. पाटील, प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी केले. 

        सदर कार्यक्रमासाठी कराड परिसरातील बहुसंख्य नागरिक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक, विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here