Home महाराष्ट्र *डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचा भीम सैनिक कांशीराम यांच्या विचाराची टक्केवारी घसरत आहे याला जबाबदार कोण..?

*डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचा भीम सैनिक कांशीराम यांच्या विचाराची टक्केवारी घसरत आहे याला जबाबदार कोण..?

292

भारतातील पंजाब राज्यातील जिल्हा खवासपूर रोपड या गावात 15 मार्च 1934 रोजी कांशीराम रामदासिया यांचा जन्म चमार जातीत झाला असून 1956 ला बीएससी परीक्षा पास झाल्यामुळे पुढे पुण्यात रक्षा विज्ञान अनुसंधान विकास संस्थेत एक्सप्लोसिव्ह रिसर्च लॅबोरेटरी अनुसंधान विभागात सहाय्यक पद प्राप्त झाले असता विकास संस्थेत कर्मचाऱ्यांना “बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी “यासाठी अनुसूचित जाती मधील कर्मचारी दीनाभाना दिवाळी प्रमाणे प्रभाकर्मचऱ्यांना सुट्टी का देण्यात येऊ नये..? यासाठी जीवाची रान करत नोकरीला ही लाथ मारतात. या वरून ही बुद्ध जयंतीची आत्मीयता, याच दिवशी सुट्टी का द्यावी..? प्रशासन इतर तारखेला देत असताना सुद्धा याच जयंतीला का बरं..? विकास संस्था प्रशासन सुद्धा सुट्टी का बर देत नसावे..? प्रशासनाने सुद्धा दीनाभाना यांना नोकरी वरून काढले होते.असे का बर होत आहे..?अशी कितीतरी प्रश्न मा.कांशीराम यांना पडले. विकास संस्था लिबर्टीवर द्वितीय श्रेणी पदावर असलेले काशीराम यांना दीनाभाना प्रकरण त्यांच्या मनाला भावले. कुटुंबाचा उदरनिर्वाह दिनाभाना यांच्या नोकरी वर असताना सुद्धा कुटुंबाची पर्वा न करता बुद्ध जयंती सुट्टीसाठी नोकरीला लाथ मारतात..? असं का बरं झालं असावं. या प्रसंगातून दीनाभाना यांच्याशी चर्चा केली असता थोडसं काशीराम यांना समजलं परंतु त्याच विकास संस्थेत असलेले कर्मचारी डी.जे.खापर्डे यांना “बुद्ध जयंती सुट्टी आणि नोकरी” हे प्रकरण समजले त्यामध्ये त्यांनी पर्याय काढत कांशीराम यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सांगत डॉ. बाबासाहेबआंबेडकर लिखित जातीप्रथेची निर्मूलन ” ॲनियलेशन ऑफ कास्ट ऑफ कास्ट ” इंग्रजी माध्यमातील पुस्तक काशीराम यांना वाचायला दिले.

त्या पुस्तका मधूनच प्रेरणा घेऊन दिनाभाना यांच्याशी चर्चा करत विकास संस्थेतून त्यांना नोकरी वरून काढल्यामुळे काशीराम यांनी दिनाभानाच्या नोकरी साठी न्यायालयात दाद मागत न्यायालयात केस जिंकून दिनाभाना यांना नोकरी देत व “बुद्ध जयंती “ची सुट्टी आज तागायत ही सुट्टी कर्मचाऱ्यां साठी कायम आहे. तथागत बुद्ध जयंतीचे निमित्त साधून काशीराम यांनी डी.जे.खापर्डे यांना सोबत घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधाराच संपूर्ण भारताला प्रगती कडे घेऊन जाऊ शकते.हे ठाम सांगत आज वास्तवात असलेले ब्राह्मणवादी पक्ष विषमतावादी विचारधारा पेरत संपूर्ण भारत अधोगती कडे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.फुले,शाहू,पीरियार, आंबेडकर विचारधाराच भारत देशाला समृद्ध करू शकते विज्ञान शाखेचा विद्यार्थी कांशीराम असल्यामुळे वेळ,बुद्धी,पैसा माध्यमातून कर्मचारी यांचे संघटन केल्या मुळे “असं होऊ शकत हे ” असा विचार मांडला व त्यांनी ब्राह्मणवादी वर्चस्वातून बहुजन समाजाला मुक्त करण्याची शपथ घेतली 1)मी विवाह करणार नाही. 2)माझ्या नावावर कोणतेही मालमत्ता असणार नाही 3) माझ्या परिवारातील कोणताही सदस्य माझ्या पक्षावर वारसदार असणार नाही 4) मी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी “पे बॅक टू सोसायटी “म्हणून काम करत राहणार अशी नियमावली तयार करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी म्हणून आदर्श निर्माण केला आहे.

फुले,शाहू,पीरियार,आंबेडकर विचारधारा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सायकल मार्च काढत फुले डॉ.आंबेडकरी विचारधारा पेरण्याचे काम हाती घेतले. विचारधारा संघटन बनवत असताना 6 डिसेंबर 1978 ला अनुसूचित जाती/जमाती कर्मचारी युनियन बामसेफ ची स्थापना 2 लाख भारतात सदस्य बनवले. त्या मध्ये 3 हजार डॉक्टर,15 हजार वैज्ञानिक, पाचशे प्राध्यापक,7000 विद्यार्थी अशी सदस्य नोंदणी करत कांशीराम यांचा कारवा वाढत असत.पुढे काशीराम यांनी 6 डिसेंबर 1981 मध्ये “डी एस फोर “ची स्थापना करत सामाजिक,शैक्षणिक कृष्णावर लढा उभारण्यासाठी व बहुजन समाजा मध्ये हक्क,अधिकार वर जन-जागृती निर्माण केली विचारधारे मध्ये 15 विरुद्ध 85 हा लढा चालवत बहुजन समाजाला “शासन करती जमात” बनवण्यासाठी त्यांनी बहुजन समाज पार्टीचे 6 डिसेंबर 1984 रोजी रोपटे लावत संपूर्ण भारतामध्ये फुले,शाहू, पीरियार,आंबेडकर विचारधारा सांगणारी राष्ट्रीय पार्टी म्हणून आज परिस्थितीला नावलौकिक आहे.बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन कुमारी मायावतीजी यांना 4 वेळेस मुख्यमंत्री करत मा.काशीराम यांनी प्रस्थापित ब्राह्मणवादी पक्षांना जादूची काडी दाखवली आहे.फुले आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्र राज्यात जन्म घेऊन ही विचारधारेवर महाराष्ट्रातील पक्ष कमी अधिक प्रमाणात चालत असतील परंतु शासन कर्ती जमात बनवणे जमले नाही.

परंतु बहुजन समाज पार्टीची राष्ट्रीय पार्टी मान्यता घेत फुले,आंबेडकर विचारधारेवर अशा परिस्थितीमध्ये 2007 नंतर अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याची दिसून येत आहे.कशामुळे..? कशाबद्दल..? हे तंतोतंत सांगणे कठीण आहे परंतु उत्तर प्रदेशामध्ये 2007 स्पष्ट बहुमत मिळवत शासनकर्ती जमात बनवत 206 सीट जिंकले असता 30.06% मतदान मिळवले परंतु 2012 नंतर बहुजन समाज पार्टीच्या 80 सीट मिळवत असता 25.95% मिळवत अधोगतीला सुरुवात झाली त्या मध्येच 2017 मध्ये 19 सीट 22.23% मतदान घेत 2022 मध्ये एक आमदार घेऊन 12.08% मतदान घेतले. त्या बरोबरच उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत 2014 मध्ये एकही सीट नाही 19.77% मतदान तर 2019 मध्ये समाजवादी पार्टी सोबत युती करून 10 शीट मिळवत 19.43%,2024 मध्ये मात्र पुन्हा नाचक्की होत शून्य शीट मिळवत 09.27 मतदान झाले.

बहुजन समाज पार्टी बहन मायावती, सतीशचंद्र मिश्रा सोबत असताना पार्टीची अधोगती का होत आहे. राष्ट्रीय पार्टी मिशनरी असलेले बहुजन समाज पार्टी शून्य खासदार कसे काय..? यावर चिंतन होणे गरजेचे असताना कांशीराम यांची बीएसपी भविष्यात काय असेल..? कांशीराम साहेबांचा उपदेश कमी पडला की काय..? अशी कितीतरी प्रश्न सामान्य मतदाराला पडल्याशिवाय राहणार नाहीत.जुने राष्ट्रीय मिशनरी नेते,कार्यकर्ते हे पक्षात आहेत की नाही.का त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बी.एस.पी.ची होत असलेली अधोगती,मतदानाची कमी होत असलेली टक्केवारी. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हत्ती निशाणी बॅलेट पेपर वरून कमी होतो की काय..? अशी किती तरी प्रश्न कार्यकर्त्यांना पडले आहेत.अशा परिस्थिती मध्येच वारसदार म्हणून आकाश आनंद यांना 10 डिसेंबर 2023 रोजी पक्षाची जबाबदारी देत पुन्हा अध्यक्ष पदा वरून पायउतार करण्यात आले. या नंतर तरी बहुजन समाज पार्टीचा हत्ती आपली घोडदौड सुधारेल का..? हे तर काळच ठरवील.

✒️राहुल साबणे(मो:-8149417161)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here