Home चंद्रपूर आमदार भोळेंनी आकाशवाणी सर्कल तोडलेच पाहिजे……

आमदार भोळेंनी आकाशवाणी सर्कल तोडलेच पाहिजे……

199

 

जळगाव शहरातील आकाशवाणी सर्कल दुष्ट हेतूने अवाढव्य बनवले आहे. स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या.आंदोलने केली. पण आमदार भोळे चूप राहिले. का? त्यांना कळत नाही का,हे चुकीचे आहे? कधी कळेल?

इतके अपघात झाले. आणि आमदार फक्त चर्चेच्या फेऱ्या करीत आहेत. चर्चा करून अपघात थांबतात का? तोडा ते सर्कल. आता तर तेथे सिग्नल बसवले आहेत. अशीच रहदारी कोर्ट चौकात आहे. पण तेथे असे अपघात होत नाहीत. येथेच कसे होतात? कारण अवाढव्य सर्कल मुळे रस्ता कोता होतो. वाहने एकमेकांना धडक मारतात. मोठी वाहने सर्कलचा टर्न घेतांना जवळचे लहान वाहने चेपतात.

काल तेच झाले. दोन ट्रक मधून जाणारा स्कूटर वाला ट्रक ने घेतलेल्या लेफ्ट टर्न मुळे ठोकला गेला. मागे बसलेली बाई चाकाखाली आली. जर सर्कल नसते तर ट्रक सरळ गेला असता. स्कूटर भी सरळ निघून गेली असती. अपघात झाला नसता. हे सांगायला कोणी इंग्लंड, अमेरिकेचा इंजिनिअर येईल का? येथील इंजिनिअर लोकांना इतकीही अक्कल नाही का?

अपघात होऊ नये म्हणून रस्ता बनवतात. पण येथे तर रस्ता बनल्यामुळे अपघात होत आहेत. हे ऐरागैरा ला कळते. आमदार भोळेंना का कळत नसेल?

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील सर्कल तोडण्यासाठी कोणाची परवानगी लागेल? नितीन गडकरींची कि नरेंद्र मोदींची कि ट्रम्प ची? तरी म्हणे, २०१४ ला भारत स्वतंत्र झाला. आता स्वतंत्र झाला तर आता तरी स्वतंत्र निर्णय घेतला पाहिजे. काल अपघात झाला. आज निर्णय घेऊन ते सर्कल तोडले पाहिजे. जर कोणी परवानगी देत नसतील तर आमदार भोळेंनी स्वतः टिकम पावडी घेऊन सर्कल तोडले पाहिजे. आम्ही येतो मदतीला.

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो.९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here