


प्रत्येक समाजात अनेक मुली लग्नाला योग्य आहेत. पण गरीब तरूणाशी लग्न करीत नाहीत. तर मग गरीब तरूणांनी अशा मुलींची कदर का करावी?
समाज समाज म्हणून तरूणांना वापरून घेतले जाते. पण एकही माणूस म्हणत नाही, कि हा तरुण आपल्या समाजाचा आहे.त्याला एखादी मुलीशी लग्न लावून दिले पाहिजे. संसाराला लावले पाहिजे.जर असे म्हणत नसतील, असे करीत नसतील तर तरूणांनी समाजाचे कौतुक का करावे?
अनेक लोकांनी जातीच्या संघटना काढल्या आहेत. त्याला सामाजिक संघटना किंवा एखाद्या महापुरुषांचे नाव दिले आहे. साधू संतांचे नांव वापरून चोर लुटमार करीत आहेत. ते इतरांना जातीचे डोस पाजतात. आपली जात खूप चांगली! आपली जात खूप बहादुर! पण ती माणसे समाजातील अविवाहित तरूणांसाठी लग्नाचा विचार का करीत नाहीत?
पण , जेंव्हा अशी मुलगी पळून गेली आणि जातीबाहेर लग्न केले तर याच तरूणांना लव्ह जिहाद सांगून आंदोलन करायला नेतात. का जावे?जी मुलगी जातीच्या माणसाची पत्नी झाली नाही,जिला जातीचा पती मान्य नाही, तिच्यासाठी जातीच्या तरूणांनी का उपद्व्याप करावेत? का आंदोलन करावे? का गुन्हे अंगावर घ्यावेत? म्हणजे तिने अब्रू विकावी आणि तरूणांनी झाकावी का?
सामाजिक संघटना चालवणाऱ्या श्रीमंत लोकांचा मी अभ्यास केला. यांच्या मुली इतर जातींच्या मुलांसोबत पळून जातात.तेंव्हा जातीच्या तरूणांना भडकवतात. आंदोलन करायला लावतात. आणि जर पळवून नेणारा बदमाष श्रीमंत असला तर हेच मुलीचे बाप समाजातील तरूणांना पत्रिका देऊन कौतुक करायला बोलवतात. का जावे तरूणांनी? का करावे कौतुक?
मी तर असाही अभ्यास केला कि, ज्यांनी समाजाच्या बाहेर विवाह केले. ते सुद्धा समाज समाज म्हणून मिरवतात. एकतर समाजाचे उल्लंघन केले. वरून समाजाचे कातडे पांघरुन मिरवतात.हे चुकीचे नाही काय?, स्वतः मिळेल ते खाल्ले. आणि दुसऱ्याला मात्र समाज समाज शिकवतात. हे बरे नाही.
आंतरजातीय लग्न करणारे एका समाजाचे नसतात. ते जन्म देणाऱ्या समाजाशी प्रामाणिक नसतात.ते जन्म देणाऱ्या समाजाशी एकनिष्ठ नसतात. ते जन्म देणाऱ्या समाजाला फसवतात. जर आंतरजातीय लग्न केले असेल तर मोठ्या मनाने सर्व जातींना आपला समाज समजून काम केले पाहिजे. एका जातीची सामाजिक संघटना चालवणे त्या त्या जातीची फसवणूक ठरते.
समाजाच्या कार्यक्रमात तरूणांना बोलवले. तेथे तरूणांनी धाडसाने बोलले पाहिजे कि,आम्ही अविवाहित राहावे काय? तुम्ही नेत्यांना पत्नी व्यतिरिक्त मैत्रीण वगैरे अनेक असतात. आणि आम्ही तरूणांनी असे ब्रम्हचारी राहून तुमचे मंडप बांधावेत का? ही आमची फसवणूक नाही का?
असे बोलले तर मला वाटते, नक्कीच सामाजिक संघटना चालवणारे उघडे नागडे पडतील. विचार करतील कि, तरूण आता आपल्यावर संतापला आहे.
जे जे सामाजिक संघटनांचे नेते पदाधिकारी असतात.आधी त्यांची कौटुंबिक कुंडली काढली पाहिजे. त्याला जर तरूण मुलगी असेल तर विचारले पाहिजे कि, आपल्या समाजातील तरूणांना तुम्ही जावई का मानत नाहीत? आपल्या समाजातील तरूणांना मंडप बांधणे, टेबल खुर्ची आणणे,भांडी आणणे, उष्टी काढायला लावणे ही त्या तरूणांची फसवणूक केली जाते. तरूणांनो, सावधान! समाजाच्या मंडपात, सभेत गेलात तर रोखठोक बोला. “मी अजूनही कुवारा का?”
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो.९२७९९६३१२२














