Home महाराष्ट्र कर्तबगार महिलांचाकेला सन्मान

कर्तबगार महिलांचाकेला सन्मान

427

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9मार्च):- गंगाखेड येथे महिला दिनानिमित्त, लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या वतीने, गंगाखेड शहरातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

 वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या- डॉक्टर शोभा काबरा, डॉक्टर अर्चना निरस, उत्कृष्ट टीम तयार करून गंगा स्वच्छता अभियान – नियमितपणे व प्रभावीपणे राबविणार्‍या एडवोकेट स्मिता देशमुख, पोलीस प्रशासनात गंगाखेड येथील गोपनीय शाखेत कार्यरत असलेल्या विमल पवार मॅडम, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंजुषा ताई दर्डा, शैक्षणिक क्षेत्रात गंगाखेडमध्ये भरपूर सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या किरण गारोळे मॅडम, पूजा दर्डा मॅडम, प्रतिभाताई वाघमारे, धार्मिक क्षेत्रामध्ये गीता मंडळाच्या मार्फत महिलांचे संघटन करून गीता अध्यायानाचे शिक्षण देणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चिंनके काकू या कर्तबगार व आदरणीय महिलांचा सन्मान करण्यात आला.

 याप्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष गोविंद निरस, सचिव राजीव आहेरकर, कोषाध्यक्ष दर्लिंग भुसणार, प्राचार्य ढाकणे सर, रामेश्वर तापडिया, दगडूशेठ सोमानी, संभाजी वाडेवाले सर, विठ्ठल प्रसाद पवार सर, शिवाजीराव डोळे, संजय शेठ धुळे, ज्ञानेश्वर कापसे, दत्तात्रय निलपत्रेवार सर, बालाजी दराडे सर, डॉक्टर के पी गारोळे, डॉक्टर बालासाहेब मानकर डॉक्टर डी के धुमाळ, नंदकुमार भरड, कल्याण तुपकर, कारभारी निरस, संदीप कोटलवार , संजय तापडिया, हरिश्चंद्र राठोड, ज्ञानेश्वर अनंतवार, प्रभाकरराव देशमुख, अंबादास कुलकर्णी, अतुल तुपकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, लायन्स परिवारातील सर्व महिला ही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या,

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी वाडेवाले सर यांनी केले व आभार प्रदर्शन लॉयन केशव देशमुख यांनी केले, लॉयन्स परिवारातील सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले, स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here