Home चंद्रपूर ओबीसी (विजा, भज व विमाप्र) समाजाच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यभर धरणे...

ओबीसी (विजा, भज व विमाप्र) समाजाच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यभर धरणे आंदोलन

274

 

चंद्रपूर : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी उद्या दि. २० फेब्रुवारी २०२५ ला जिल्हाधिकारी कार्यालय समोर दुपारी १२ ते ३ वाजे पर्यंत चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे चंद्रपूर दि. ११ सप्टेंबर २०२३ ला अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तेव्हा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई सह्याद्री सभागृह येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झालेल्या बैठक झाल्यावर ३० सप्टेंबर २०२३ ला त्या वेळचे उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबिसीच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गे लावण्यात येईल असे लिखित आश्वासन चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडते वेळी दिले होते.
परंतु त्यापैकी काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत त्यात बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबिसी, व्हीजे, एनटी/ विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागासवर्गीयाचे आरक्षण लागू करण्यात यावे, सारथी व बार्टी प्रमाणे दि. २३ सप्टेंबर २०२४ च्या मंत्री मंडळ निर्णयाप्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या ओबीसी, भटके विमुक्त व एस. बी. सी विद्यार्थी यांना २ वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप तात्काळ अदा करावी. ओबीसी, विजा, भज व विमाप्र सुशिक्षित बेरोजगारा व्याज परतावा कर्ज मर्यादा १५ लक्ष करण्यात यावी, ओबीसी मुलांना भारत सरकार स्कॉलरशिप १०० टक्के करण्यात यावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचे प्रमुख उपस्थित आंदोलन करण्यात येत आहे. तरी या आंदोलनात उपस्थीत रहावे असे आवाहन राष्ट्रीय युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here