Home महाराष्ट्र 18 व 19 फेब्रुवारी रोजी अड्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अनावरण...

18 व 19 फेब्रुवारी रोजी अड्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अनावरण सोहळा

375

✒️अड्याळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अड्याळ(दि.13फेब्रुवारी):-श्री शिवजन्मोत्सव सोहळा समिती व ग्रामवासी अड्याळ यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा अड्याळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवार१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी विशेष आकर्षण म्हणून आयोजकांच्या वतीने सायंकाळी ५ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज जुना आखाडा (दांडपट्टा प्रदर्शन) पवनी गृप, तसेच सायंकाळी ७ वाजता राजमाता ढोल ताशा पथक मौदा यांच्या संचाला पाचारण करण्यात आले आहे. अनावरण सोहळा मुख्य कार्यकामात खासदार प्रशांत पडोळे , आमदार नरेंद्र भोंडेकर, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मानापुरे, अध्यक्ष आझाद शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाई , ग्राम विकास अधिकारी पौर्णिमा साखरे , अध्यक्ष तंटामुक्त समिती नरेंद्र अंबादे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती मित्र मंडळ, राजे गणेश मंडळ, नवदुर्गा व एकलव्य ग्रुप, रंगा रंग क्रीडा मंडळ, सर्पमित्र फ्रेंड्स ग्रुप ,मोरया ग्रुप ,विठ्ठल रुक्माई मंडळ, ग्रामगीता गणेश मंडळ, सुबोध दुर्गा मंडळ, साई गणेश उत्सव मंडळ, परमात्मा एक सेवक मंडळ, सत्यसाई सेवा मंडळ, आटो लाईन गणेश मंडळ मुस्लिम कमिटी, वैशाली बौद्ध विहार कमिटी, मैत्रेय बौद्ध विहार कमिटी, संरक्षण टीम सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न होणार आहे.

१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता समाजबांधवाचे एकत्रीकरण, सकाळी ७:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक, सकाळी ८ वाजता लेझिम पथकासह पालखी सोहळा, सकाळी ११ वाजता शिवछत्रपती यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण तसेच पूजन, ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच दुपारी २ वाजता ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम व सायंकाळी ६ वाजता महाप्रसाद वितरीत करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here