Home महाराष्ट्र गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

189

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

 गंगाखेड(दि.28जानेवारी):-शहरातील गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल येथे दि.26 जानेवारी रविवार रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉन्ट्रॅक्टर संतोष तापडिया, सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ सातपुते, भारतीय सेनेचे कॅप्टन भानुदास पवार, पत्रकार महेमूद शेख, शाळेच्या प्राचार्य कविता साळवे उपस्थित होते. 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाला राष्ट्रगीत गायन करुन सलामी देण्यात आली व त्यानंतर टीएम सावंत क्रीडा मैदानावर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून देशभक्तीपर नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनावर भाषणे दिली कार्यक्रमाच्या शेवटी चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्रवणकुमार देवी, शिक्षक वृंद व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल मुजमुले यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता 7 मधील विद्यार्थि मिथिलेश तांदळे यानी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here