Home महाराष्ट्र चि. ‘सार्थक’ चा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत भारतातून 5 वा रँक!

चि. ‘सार्थक’ चा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत भारतातून 5 वा रँक!

237

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.28जानेवारी):-येथील जेट किडस इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ५वी शिकत असलेला चि. सार्थक मनिषा-दिपक भवरे याने दि.८ डिसेंबर २४ रोजी पुणे येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत भारतातून ५वी रँक संपादन करून पुसद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अतिशय खडतर अशी ही परिक्षा असून भारतात केवळ 5 स्कूल कर्नाटक,राजस्थान आणि हिमाचालप्रदेश येथे स्थित आहेत. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परिक्षा देत असतात.मात्र सिव्हीलिअन कोटा फक्त ३०%असल्याने खूप चुरशीची स्पर्धा यात असते. सार्थक ने नियमित अभ्यासपूर्ण प्रयत्नातून हे यश मिळविले आहे.

यापूर्वी देखील sip abacus राष्ट्रीय स्पर्धेत हैदराबाद येथे प्रथम क्रमांक प्राप्त केला असून नुकत्याच झालेल्या sof olympiad math विषयात internation rank-19 मिळवून 2nd लेवल साठी पात्र झाला आहे.

या त्याच्या यशात त्याचे गुरुजन, आई-वडील आणि मित्रमंडळ यांचा मोलाचा वाटा आहे.सार्थकच्या उत्तुंग कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here