पुसद प्रतिनिधी….. पुसद येथे दि.15/07/2024 पासुन मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंतराव मनवर यांचे साखळी उपोषण सुरु असुन याकडे पुसदचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का… कळायला मार्गच नाही मौजे मोहा (ई) ग्राम पंचायत अतंर्गत रामनगर तांडा,व गणुनाईक तांडा येथे झालेल्या 25/15 या आमदार,व खासदार निधीतुन झालेले सिमेंट कॉक्रीट रस्ते व शिवानगर येथे नालीचे काम अतिशय निकृष्ठ दर्जेचे झाले असुन या कामाकडे जेई चे वरीष्ठ अधीकाऱ्याचे मुद्दामच दुर्लक्ष करीत असल्याचे कळते. थोडक्यात वृत्त असे की,कंत्राटदार मयुर संजय चव्हाण हे कधी कामावर जातीने हजर नसुन त्यांचे पिता वत्सलाबाई नाईक महीला महाविद्याल सेवानिवृत्त प्रा.संजय शंकरराव चव्हाण रा.रामनगर ह.मु.पुसद हे नाईकांचे निकष्ठत आहे. आणी पालकमंत्री संजय राठोड यांचे खासन खास आहे. त्यांनी त्याच्या स्वतःच्या नावे मयुर संजय चव्हाण जे जुनियर इंजिनियर असे म्हणतात पण कधी आम्हा ऑफीसमध्ये आढळुन आले नाही. व कधी डोळ्यानी सुद्धा दिसतच नाहीत. बहुतेक बाहेरगावी शिक्षण घेत असते की काय माहीत… नाही.. असो बाप तर कंत्राटदार म्हणुन स्वतः तरी काम पाहतो.आज रोजी त्यांच्याच रामनगर तांड्यामध्ये सिंमेट रोडचे जे कंत्राटदार म्हणुन दिले होते गांव विकासाच्या मतदार संघाच्या विकासाच्या बाता करणारा या महानुभवाचे मुलाने अत्यत निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आले आहे.त्या संदर्भात सखोल चौकशी करुन योग्य ति कार्यवाही करावी. आणी सदरील कंत्राटदारांचे नांव काळ्या यादीत टाकावे आणी काम जे चांगले झाले आहे असे जे म्हणने आहे ते खोटें आहे तुम्हाला लाडकी बहीन योजने मध्ये लाभ मिळवुन देतो म्हनुन सह्या घेण्यात आल्या असाव्यात कीवां कोऱ्या कागदा बकऱ्याचे लोन काढुन देतो असे गरीबांना आमिष दाखवुन खोटया सह्या घेतल्या आहेत.त्यामुळे त्यांची भ्रष्ट्राचाराची पाठ राखन करणाऱ्या अधिकाऱ्यानी त्या कामाचे निकष व इंस्टीमेटनुसार लांबी-रुंदी करण्यात आले का..? यासंदर्भीय त्या कामाचे प्रभार असलेल्या अधिकाऱ्याना त्वरीत निलंबित करण्यात यावे असे तक्रारकर्ते बळवंतराव मनवर यांनी मागणी केली आहे.
Home यवतमाळ प्रदेशाध्यक्ष मानवविकास परिषद महाराष्ट्र राज्य बळवंत मनवर यांचा उपोषणाचा पाचवा दिवस..!! प्रशांसनाला...