


✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. 30 जुलै) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे प्रवेश सत्र 2024-25 या वर्षात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, प्रवेश अर्जांची दुरुस्ती करणे व जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश अर्जाचे निश्चिती करुन फॉर्म सादर करणे व प्रवेशासाठी ट्रेड चा पसंतीक्रम सादर करण्यासाठी 30 जून 2024 ही अंतिम मुदत होती.
सदर अर्ज भरण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचे कडून 3 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात देण्यात आली आहे.
सदर प्रक्रिया कार्यालयीन व सुट्टीच्या दिवशी सुद्धा सर्व आयटीआय मध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत सुरू राहणार आहे.
प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीसाठी दि. 3 जुलै पर्यंत प्रवेशासाठी संस्थानिहाय व्यवसायाचा पसंतीक्रम भरता येणार आहे.
आयटीआय उमरखेड येथे ईलेक्ट्रिशियन-20 जागा, वायरमन-20 जागा, फिटर-20 जागा, मोटर मेकॅनिक-24 जागा डिझेल मेकॅनिक -48 जागा पत्रे कारागीर-20 जागा, कोपा-48
जागा, ब्युटीपार्लर-24 जागा, ड्रेस मेकिंग -20 जागा यानुसार एकुण 320 जागांवर मेरीट नुसार सदर व्यवसायात प्रवेश दिले जाणार आहे.
कमी वेळेत कमी खर्चात खात्रीशीर झटपट नोकरी किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणारे शिक्षण म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते.
यावर्षी महाराष्ट्र राज्यातील 2.5 लाख विद्यार्थ्यांनी आजपर्यंत प्रवेश अर्ज भरलेले आहेत.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आयटीआय ला फॉर्म भरून भरण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य डी. पी. पवार यांनी केले आहे.














