


यवतमाळ प्रतिनिधी|
स्वप्निल गोरे
महाराष्ट्रातील अनेक नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या यवतमाळ जिल्हा सहसचिव पदी युवा कवी मा. अमरदीप नामदेवराव कलाने यांची निवड करण्यात आली आहे.
अमरदीप कलाने हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील रासेगाव या गावचे रहिवासी आहेत.
कॉलेजमध्ये असताना त्यांना कविता लिहिण्याचा छंद लागला व त्यांनी आपला छंद कायम जोपासला. महाविद्यालयात होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभाग घेतात आणि आपल्या कलेला अधिक बळकट करण्याचे सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यांची हीच साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील आवड बघून अमरदीप कलाने यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या यवतमाळ जिल्हा सहसचिव पदी त्यांची निवड करण्यात आली. अमरदीप कलाने यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. विशाल शिरसाट , राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.विजय जायभाये, अमरावती प्रदेश कार्याध्यक्ष मा.अविनाश ढळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. स्वप्निल गोरे तसेच यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मा. सौ सीमा अलोने मॅडम इत्यादींनी त्यांचे कौतुक केले.













