Home महाराष्ट्र वेणुताई चव्हाण कॉलेज मध्ये अग्रणी महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संकल्पना...

वेणुताई चव्हाण कॉलेज मध्ये अग्रणी महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संकल्पना व अंमलबजावणी या विषयावर विद्यापीठ स्तरीय चर्चासत्र संपन्न

160

 

कराड : (दि. 26, प्रतिनिधी )श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे इतिहास विभाग, IQAC व अग्रणी कॉलेज बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विद्यापीठ स्तरीय एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन शनिवार दिन. 24 फेब्रुवारी, 2024 रोजी करण्यात आले. या चर्चासत्रात साधनव्यक्ती म्हणून मा. प्राचार्य डॉ. एस. आर. घाटगे (शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे कॉलेज, कराड) यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. साधनव्यक्ती म्हणून बोलत असताना प्राचार्य डॉ. घाटगे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे ध्येयधोरणे, उद्दिष्टे सांगितले. नवीन धोरणानुसार होणाऱ्या शैक्षणिक आकृतीबंध मधील बदल विद्यार्थ्यांना समजतील अशा सहज आणि सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगितला. नवीन शिक्षण प्रणाली मधील विद्यार्थी केंद्रित ध्येयधोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राचार्य डॉ. घाटगे यांनी Six Vertical Frameworks with Baskets या घटकावर प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन केले. सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद झाल्यानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी चर्चा केली. सर्व संकल्पना, नवीन आव्हाने, शासनाची ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चर्चासत्राच्या शेवटी प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले. प्राध्यापकांच्या विविध विषयासंबंधी, कामाची विभागणी अशा अनेक शंकांचे निरसन सरांनी अत्यंत सोपे करून सांगितले.
चर्चासत्राचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य डॉ. सौ स्वाती सरोदे यांनी भूषवले. चर्चासत्राचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. आर. थोरात यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. श्रीमती एम. एम. चव्हाण यांनी करून दिली. चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती ए. एम. मुजावर यांनी केले. तसेच सर्वांचे आभार प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी मानले. सदर चर्चासत्रास महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here