Home महाराष्ट्र सत्यपाल महाराजांना “महाराष्ट्र भुषण” पुरस्कार देऊन सन्मानित करा ! आमदार देवेंद्र...

सत्यपाल महाराजांना “महाराष्ट्र भुषण” पुरस्कार देऊन सन्मानित करा ! आमदार देवेंद्र भुयार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !

444

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भुषण” हा सर्वोच्च पुरस्कार देवून गौरविण्याची मागणी केली.
सत्यपाल महाराज राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्तखंजेरी चादक गेल्या ५५ वर्षा पासून सातत्याने युवा पिढी घडविणे तसेच समाजात राजविण्यात आलेल्या अणावश्यक रुढी परंपरेपासुन परावृत्त करण्यासाठी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा वारसा चालवित असुन सातत्याने त्यांचे विचार महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रा बाहेर इतर राज्यात सुध्दा घरादारात किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून रुजवित आहे.
सत्यपाल महाराज अतिशय मोलाचे प्रबोधन करीत असल्यामुळे त्यांचेवर प्रेम करणारी महाराष्ट्रातील प्रचंड प्रमाणात जनता आहे. तसेच त्यांचे अविरत कार्य महाराष्ट्रातील पुढील पिढीला व घराघरात योग्य दिशा दर्शक ठरणारा आहे. त्यामुळे श्री. सत्यपाल महाराज यांचे कार्याची दखल घेदुन महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत असलेला “महाराष्ट्र भुषण” हा सर्वोच्च पुरस्कार देवुन गौरविणे क्रमप्राप्त असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री यांना भेटून सांगितले असून सत्यपाल महाराज यांच्या सुरु असलेल्या अविरत कार्याची दखल घेवुन त्यांना महाराष्ट्र भुषण” हा सर्वोच्च पुरस्कार देणेसाठी शिफारस महाराष्ट्र शासनाकडे आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here