Home मुंबई धम्म संस्कार वर्गाची गरज!

धम्म संस्कार वर्गाची गरज!

234

 

 

बुद्ध विहार म्हणजे काय? बुद्ध विहार म्हणजे केवळ दगड, विटा, माती, सिमेंट, लोहा यांनी बांधलेली वास्तू नाही तर बुद्ध विहार म्हणजे आमचं सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान असले पाहिजे.
बुद्ध विहार म्हणजे संस्कार केंद्र,बुद्ध विहार म्हणजे माणसाशी माणसाना जोडणारा दुवा,बौद्ध विहार म्हणजे आमच्या मानसिक,वैचारिक विकास साधणारे केंद्र. बुद्ध विहार म्हणजे समाज एकत्रित आणणारे लोहा चुंबक. त्यासाठी धम्मा संस्कार वर्गाची गरज आहे. बुद्ध विहार म्हणजे आमच्या गावची छोटीशी संसद.बुद्ध विहार म्हणजे आमच्या गावच विद्यापीठ.बुद्ध विहार म्हणजे खऱ्या अर्थाने संस्कार केंद्र. बुद्ध विहाराला आम्ही संस्कार केंद्र बनविल पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म देऊन ६७ वर्षे झाली.या ६७ वर्षांमध्ये आमची धार्मिक प्रगती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही, कारण आम्हाला काहीच माहिती नाही. त्रिशरण पंचशीला शिवाय आम्हाला काहीच माहिती नाही.बौद्ध पूजा पाठ, 22 प्रतिज्ञा, संस्कार हे तर फारच दूर राहिले. कारण धम्मा संस्कार वर्गात गेलेच नाही. म्हणूनच धम्मा संस्कार वर्गाची गरज आहे.
मुसलमान समाजामध्ये छोटी छोटी मुलं अजान म्हणतात. बारीक मुलाचा आवाज येतो ‘अल्लाहू अकबर अल्ला ह’ हिंदूच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही भजन ऐकता आरत्या ऐकता कीर्तन ऐकता त्यामध्ये छोट्या छोट्या मुलांचा आवाज असतो. चर्चमध्ये जर आपण गेलो तर तेथे छोटे छोटे मुल असतात. गुरुद्वारामध्ये जर आपण गेलो तर तिथे छोटी छोटी मुलं लंगर करत असतात. म्हणजे सांगण्याच तात्पर्य हे आहे की आमच्या आसपास राहणारा समाज मग तो मुसलमान असो हिंदू असो ख्रिश्चन समाज असो. जैन समाज असो प्रत्येक समाज आपापल्या श्रद्धास्थानी जातो. कारण ते संस्कार त्यांचावर लहानपणापासून आईवडील आणि समाज करतो.
मुसलमान बांधव पाच वेळची नमाज पडत असतो पहाटेची नमाज दीड वाजताची नमाज साडेचार वाजताची नमाज दिवस बुडत असतानाची नमाज साडेआठ वाजताची नमाज प्रत्येक नमाजला वेगवेगळी नावे दिली आहे ही सर्व पाचही नमाज मुसलमान बांधव पडत असतो आणि तो आमच्या समोरून जातो. जाताना आम्ही पाहतो. शिख बांधव आपल्या गुरुद्वारात जातात.ख्रिश्चन बांधव आपल्या चर्चमध्ये जातात, जैन बांधव त्यांच्या जैन मंदिरात जातात, ज्या वस्तीत आम्ही राहतो त्या वस्तीतच असे लोक राहतात की जे आपल्या श्रद्धास्थानी जात असतात मग आम्ही असा विचार केला पाहिजे की हे लोक आपल्या श्रद्धास्थानी जातात मग माझे श्रद्धास्थान कोणते आहे? प्रत्येकांनी स्वताला विचारले पाहिजे.जर त्याचे उत्तर येईल “बुद्ध विहार” असेल तर मग स्वतःला प्रश्न विचारा बुद्ध विहारात मी का जात नाही? मी का जाऊ नये? मी पण गेलो पाहिजे. कमीत कमी यांचं इतर समाजाचे पाहून तरी गेलो पाहिजे.
तर सांगण्याचा तात्पर्य हे आहे की जोपर्यंत मी स्वतःला विचारणार नाही की माझं श्रद्धास्थान कोणत आहे तोपर्यंत मी विहारात जाऊ शकत नाही कारण हा जबरदस्तीचा धर्म नाही तर उपजत मनामध्ये ही श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. बुध्दा प्रति, धम्माप्रती, संघाप्रती, विहारा प्रती, बाबासाहेबा प्रति जेव्हा अशी श्रद्धा निर्माण होईल तेव्हाच त्याची पावले बुद्ध विहाराकडे वळतील.मग त्या माणसाने त्या माणसाला विचारावं तुम्हाला काय येते? काही येत नाही. मग तुमचं जीवन गेलं वाया. मग तुम्हाला तुमच्या मुलाचं जीवन वाया घालवण्याचा काय अधिकार आहे ? कमीत कमी ही मुलं जर विहारात आली तर ती काहीतरी शिकतील धम्माच्या मार्गाने लागतील धम्माच्या मार्गाने चालतील आणि उद्याचा समाज जिवंत राहील. उद्या चांगला समाज अस्तित्वात येईल पण कधी जेव्हा धम्म संस्कार वर्गात आली तर. तेव्हा ही मुलं तयार होतील. ठीक आहे आपल्याने काही झाले नाही कमीत कमी मुलांना तरी शिकू द्या हा वर्ग कोणीही आपल्या गावात सुरू करू शकतो यासाठी फार काही लोक पाहिजे असं नाही फक्त समाजाचं कसं होईल, तरुण पिढीचं कसं होईल, लहान मुलांचं कसं होईल, गावात एकीकरण नाही,कुणाचं कोणी ऐकत नाही,कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचा चेला नाही अशी चिंता करण्यापेक्षा स्वताच सुरवात करावी.मी दररोज अनेक लोकांचे स्टेट्स पाहतो. कोणी स्वताच्या घरात बुद्ध व बाबासाहेबांच्या मूर्ती समोर हात जोडून वंदन करतांना दिसत नाही. पण माझे मार्गदर्शक गुरुवर्य जेष्ठ पत्रकार कामगार नेते साहित्यिक सागर रामभाऊ तायडे दररोज सकाळी वंदना करणारे तीन फोटो दररोज स्वताच्या दोन्ही मोबाईलवर स्टेट्स ठेवतात.ते कोणाला सांगत नाही तर प्रथम विचाराने आचरण करतात.आम्ही फक्त चर्चा व टीका करतो. म्हणूनच स्वता पासून सुरवात केली पाहिजे.ते पाहून काही लोक घरातून विहारात येतील तर काही चर्चा करतील. म्हणूनच धम्मा संस्कार वर्गाची गरज आहे.ज्यांना वाटते त्यांनी एकत्र आले पाहिजे.

गौतम भिमराव मोरे,(कवी, गायक) भांडूप,मुंबई, मो. ९६०४७०२६५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here