Home यवतमाळ उपविभागिय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने 5 जणांच्या आमरण उपोषणाची सांगता (कमलबाई...

उपविभागिय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने 5 जणांच्या आमरण उपोषणाची सांगता (कमलबाई गाडगे व दिव्यांग संतोष आलट यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या उपस्थीतीत उपोषण सोडले..!)

147

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड : – (दि. 16 सप्टेंबर) मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, सराटी आंतरवाली येथे पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांप्रमाणे उमरखेड महागाव पुसद या तीन तालुक्यांचा शुद्धीपत्रक काढून जीआर मध्ये समावेश करावा या प्रमुख मागण्यांसाठी दि.
5 सप्टेंबर पासून सचिन घाडगे, गोपाल कलाणे, सुदर्शन जाधव, शिवाजी पवार, शरद मगर यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाची सांगता उपविभागिय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्या लेखी पत्राने करण्यात आली.

उपोषण कर्त्यांच्या मागणीनुसार उमरखेड महागाव पुसद या तीन तालुक्यांचा समावेश मराठवाडयातील 8 जिल्ह्यांप्रमाणे जीआर मध्ये शुद्धीपत्रक काढून समावेश करावा..! असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याने उपोषण कर्त्यांचे समाधान झाले.

यावेळी सराटी आंतरवली येथून मनोज जरांगे पाटील यांनी भ
भ्रमणध्वनी वरुन व्हिडीओ कॉल व्दारे उपोषण कर्त्यांशी संवाद साधला तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे कट्टर आंदोलक दत्ता पाटील हडसनकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती . दिव्यांग बांधव संतोष आलट व उपोषणकर्त्यांचे आई कमल घाडगे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक विनायक कोते , – ठाणेदार शंकर पांचाळ उपस्थित होते.
—–
सरकारने ओबीसी मर्यादा वाढवून महाराष्ट्रतील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे . सरकारने 40 दिवसांत निर्णय घ्यावा सरकारला आही 40 दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत – संदिप घाडगे
समन्वयक मराठा क्रांती मोर्चा उमरखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here