Home यवतमाळ भीमवंश या सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा भिमटायगर सेनेत जाहीर...

भीमवंश या सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा भिमटायगर सेनेत जाहीर प्रवेश

169

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 26 ऑगस्ट) तालुक्यातील ढाणकी येथील भीमवंश या सामाजिक संघटना चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष करण भरणे सर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी “ज्वलंत आंबेडकर वादाचा पुरस्कार करणारे, लढाऊ वैचारिक व आक्रमक असलेले अराजकीय सामाजिक संघटना म्हणजेच भिम टायगर सेना या संघटनेमध्ये संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वात हदगाव येथे जाहीर प्रवेश करण्यात आला.

तर करण भरणे सर यांची यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भीम टायगर सेना यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष श्यामदादा धुळे, उमरखेड शहर प्रमुख तथा पत्रकार सिद्धूभाऊ दिवेकर उमरखेड, तालुका अध्यक्ष कैलासदादा कदम हदगाव येथील भीम टायगर सेनेचे नेते इसा भाई कुरेशी, शेख माजिदभाई, भिम टायगर सेना मुस्लिम आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष शेख गौस, हदगाव शहर युवा अध्यक्ष शेख मुनीर, मुस्ताक कुरेशी, मोईस पठान, शेख इम्रान चाउस, सिंघम ढगे, माधव पाटील सूर्यवंशी, शिवाभाऊ दवणे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here